एबी डिव्हिलियर्स हा क्रिकेटविश्वातील एक नावाजलेला खेळाडू आहे. संपूर्ण क्रिकेटविश्वात त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ३७ वर्षीय एबी डिव्हिलियर्सने आपल्या कुटुंबासह आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने या घोषणेनंतर सर्वांना आश्चर्यचकित केले होते. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा मॅच विनर खेळाडू आहे. याच डिव्हिलयर्सने आता त्याच्या आयपीएलमधील निवृत्तीबाबत वक्तव्य केले आहे.
डिव्हिलियर्स इंस्टाग्रामवर एका लाइव्ह सत्रात बोलत असताना त्याला आयपीएलमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देत तो म्हणाला की, “आयपीएलमधून निवृत्ती घेण्यासाठी अजून बरीच वर्षे बाकी आहेत. आयपीएलमध्ये मला अजून माझी क्षमता सिद्ध करायची आहे आणि आपल्या माझ्या संघाला जेतेपद मिळवून द्यायचे आहे.”
“आयपीएलमध्ये खेळणे, एक किंवा दोन विक्रम मोडणे, प्रेक्षकांसमोर खेळणे, माझे सहकारी खेळाडूही माझ्या प्रदर्शानामुळे आनंदी आहेत याची जाणीव होणे. मला ते क्षण एकदा किंवा दोनदा, कदाचित तीन किंवा चार वेळा अनुभवण्याचा विशेषाधिकार आहे. एकंदरीत माझी आयपीएलमध्ये आणखी काही हंगाम खेळण्याची योजना आहे,” असेही त्याने म्हटले.
Found the video. Hear carefully to what AB says in the last 6-7 seconds. Clearly hinting that he isn't planning to retire soon. ????✌ https://t.co/98oylqaKnw pic.twitter.com/zPCvC6wKHd
— harsh (@kohlisflick) August 2, 2021
यंदा बेंगलोर संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांनी पहिल्या टप्प्याखेर गुणतालिकेत टॉप-३ मध्ये जागा मिळवली आहे. अशात पुढेही हीच लय कायम संघ इतिहास घडवण्याचा बेंगलोर संघाचा इरादा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“त्याला बाद केले तरी मला फरक पडणार नाही”, जेम्स अँडरसनचे भारतीय कर्णधाराबाबत वक्तव्य
रूटने नाणेफेक जिंकली अन् विराटचा नावे झाला नकोसा विक्रम, धोनीलाही टाकलंय मागे
“मला खात्री आहे, विराट भैय्या भारताला इंग्लंडमध्ये मालिका जिंकून देईल”






