क्रिकेट जगतात खळबळ उडवून देणारे वृत्त दक्षिण आफ्रिकेतून आले आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर, एबी डिविलियर्स आणि ग्रॅमी स्मिथ सारख्या दिग्गज खेळाडूंवर वर्णद्वेषासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. चला तर जाणून घेऊया काय आहे नेमकं प्रकरण.
या घटनेमुळे देशातील क्रिकेटमध्ये नवे वादळ येण्याची शक्यता वर्गातील जात आहे. सामाजिक न्याय आणि आयोगाचे प्रमुख डुमिसा एन. यांनी २३५ पानांच्या अंतिम अहवालात क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि एबी डिव्हिलियर्स, मार्क बाऊचर आणि ग्रॅमी स्मिथ सारख्या माजी खेळाडूंविरुद्ध पूर्वग्रहदूषित वर्तन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.
हे प्रकरण चर्चेत असताना दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने ट्विट करत म्हटले की, “क्रिकेटमध्ये समान संधी मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय आणि राष्ट्र निर्माण आयोगाच्या मिशनला माझा पाठिंबा आहे. हेच सत्य आहे.”
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, सामाजिक न्याय आणि राष्ट्र निर्माण आयोगाने दक्षिण आफ्रिकन क्रिकेटमधील वंश आणि लिंगावर आधारित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कायमस्वरूपी लोकपाल नेमण्याची शिफारस केली आहे. हा धक्कादायक प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा पॉल ऍडम्सने सांगितले की, त्याच्या संघ सहकाऱ्यांनी वर्णावरून त्याचे टोपण नाव ठेवले होते.
I support the aims of CSA’s Social Justice and Nation Building process, to ensure equal opportunities in cricket. However, in my career, I expressed honest cricketing opinions only ever based on what I believed was best for the team, never based on anyone’s race. That’s the fact. pic.twitter.com/Be0eb1hNBR
— AB de Villiers (@ABdeVilliers17) December 15, 2021
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी फिरकीपटू पॉल ऍडम्सने म्हटले की, “दक्षिण आफ्रिका संघात असताना मार्क बाऊचरसह संघातील इतर खेळाडूंकडून वर्णाच्या आधारे बदनामी करण्यात आली होती.” पॉल ऍडम्सला वर्णावरून टोपण नाव देणाऱ्या खेळाडूंमध्ये मार्क बाऊचरचा देखील समावेश होता. याची मार्क बाऊचरने स्वतः कबुली दिली आहे. मार्क बाऊचरने आपली चूक मान्य केली आणि माफी देखील मागितली.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या ऍशेस कसोटीत वॉर्नर, स्टोक्स, अँडरसन रचू शकतात इतिहास, ‘या’ मोठ्या विक्रमांची होणार नोंद
रोहितच्या दुखापतीनंतर कसोटीच्या उपकर्णधारपदाबाबत निर्माण झाला तेढ, ‘हे’ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार
ब्रॉडने १५० वा कसोटी खेळताच इंग्लंडची ऑस्ट्रेलियाशी बरोबरी, टीम इंडियाचाही विक्रमाच्या यादीत समावेश