भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा शाहीनशहा आफ्रिदी यांची सातत्याने तुलना केली जाते. दोघेही आपापल्या देशातील सर्वोत्तम गोलंदाज मानले जातात. या दोघांची तुलना करत असताना आता पाकिस्तान माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक याने एक विधान केले आहे. यामध्ये त्याने आफ्रिदी हा बुमराहपेक्षा कितीतरी पटीने सरस असल्याचे म्हटले.
रज्जाक नुकताच एका टीव्ही चॅनेलवर बोलत होता. त्यावेळी त्याने म्हटले,
“खरे सांगायचे झाल्यास शाहीन हा बुमराहपेक्षा खूप पुढे आहे. बुमराह त्याच्या आसपासही नाही.”
सध्या पाकिस्तानच्या निवड समितीचा सदस्य असलेला रज्जाक बुमराहविषयी असे बोलण्याची ही पहिली वेळ नाही. 2019 मध्ये त्याने बुमराहला बेबी बॉलर म्हटलेले. आपण आपल्या काळात अनेक दिग्गजांचा यशस्वी सामना केला असल्याने बुमराह आपल्यापुढे बेबी बॉलर असल्याचे तो म्हणाला होता.
बुमराहच्या विचार केल्यास त्याने आत्तापर्यंत कसोटीत 128, वनडेत 121 व टी20 म़ध्ये 71 बळी टिपलेले आहेत. तसेच त्याला भारतीय संघाचे नेतृत्व देखील करण्याची संधी मिळाली. दुसरीकडे आफ्रिदी याने पाकिस्तानसाठी कसोटीमध्ये 92, वनडेत 62 व टी20 मध्ये 58 बळी मिळवले आहेत. त्याच्या नेतृत्वात लाहोर कलंदर संघाने पाकिस्तान सुपर लीग चे विजेतेपद जिंकलेले.
बुमराह आणि शाहीन दोघेही सातत्याने दुखापतींमुळे त्रस्त आहेत. बुमराह दुखापतीमुळे आशिया चषक, टी20 विश्वचषक खेळू शकला नाही. तर, आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर, विश्वचषकात खेळताना दिसला. मात्र, अंतिम सामन्यात पुन्हा एकदा त्याला दुखापत झाली. पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधून बुमराह पुनरागमन करणार का हे पाहणे रंजक ठरेल. तर, शाहीन पाकिस्तान सुपर लीगमधून पुन्हा मैदानावर येऊ शकतो.
(Abdul Razzaq Said Shaeen Afridi Far Better Than Jasprit Bumrah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयी चौकार मारण्याआधी हार्दिकने दिलेला ‘हा’ कानमंत्र, स्वतः सूर्याने केला खुलासा
लखनऊ टी20 नंतर संतापला कॅप्टन हार्दिक! म्हणाला, “टी20 मध्ये तुम्ही अशा खेळपट्ट्या देता?”