दक्षिण आफ्रिका येथे खेळला गेलेला पहिला महिला अंडर 19 टी20 विश्वचषक भारतीय संघाने आपल्या नावे केला. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत विश्वचषक उंचावला. शफाली वर्माच्या नेतृत्वातील या युवा संघाचे सर्वत्र कौतुक होतेय. मात्र, या संघाला मार्गदर्शन करणाऱ्या मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय क्रिकेटपटू नुशीन अल खादीर यांची कहाणी अगदी चक दे चित्रपटाला साजेशी अशीच आहे.
जवळपास पंधरा वर्षांपूर्वी शाहरुख खान अभिनित चक दे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. भारतीय हॉकी माजी कर्णधार कबीर खान या नावाचे पात्र शाहरुखने या चित्रपटात साकारलेले. महत्त्वाच्या स्पर्धेत गोल करण्यात अपयशी आल्याने त्याच्यावर फिक्सिंग केल्याचा आरोप ठेवला जातो. मात्र, काही वर्षानंतर तोच कबीर खान आपल्या मार्गदर्शनाखाली भारताच्या महिला हॉकी संघाला विश्वविजेता बनवतो, अशी ही कथा होती. याच कथेच्या काहीशी जवळ जाणारी कहानी नुशीन यांची आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाला 2005 वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या पराभूत संघाच्या सदस्य नुशीन या होत्या. त्यांनी त्या सामन्यात 10 षटकात केवळ 35 धावा दिलेल्या. त्यावेळी विश्वविजेता होण्याचे राहिलेले स्वप्न त्यांनी यावेळी प्रशिक्षक या नात्याने पूर्ण केले. विशेष म्हणजे, तो विश्वचषक देखील दक्षिण आफ्रिकेतच खेळला गेला होता. आता जवळपास अठरा वर्षांनी विश्वविजेती प्रशिक्षक होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणाऱ्या नुशीन या भारतासाठी नीतू डेव्हिड यांच्यानंतर 100 वनडे बळी मिळवणाऱ्या केवळ दुसऱ्या गोलंदाज होत्या. त्यांनी आपल्या वनडे कारकीर्दीत 78 सामने खेळताना 100 बळी मिळवले. तर, 5 कसोटींमध्ये त्यांच्या नावे 14 बळी आहेत. 41 वर्षीय नुशीन रेल्वे महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक देखील असून, वुमन्स टी20 चॅलेंज स्पर्धेत त्यांनी सुपरनोव्हाज संघाला प्रशिक्षण दिलेले.
(India U19 T20 World Cup Winning Coach Nooshin Al Khadeer Story Close To Chak De Shahrukh Khan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊ टी20 नंतर संतापला कॅप्टन हार्दिक! म्हणाला, “टी20 मध्ये तुम्ही अशा खेळपट्ट्या देता?”
विजयी चौकार मारण्याआधी हार्दिकने दिलेला ‘हा’ कानमंत्र, स्वतः सूर्याने केला खुलासा