---Advertisement---

IND vs ENG: एजबेस्टनमध्ये अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळणार का? टीम इंडिया करू शकते प्लेइंग 11मध्ये मोठा बदल

On: शनिवार, जून 28, 2025 10:32 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड दोन्ही देशांमध्ये (Test Series IND vs ENG) यांच्यात 5 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा दुसरा सामना एजबेस्टनच्या मैदानावर होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला (Team india) 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. एजबेस्टनमध्ये भारताचा विक्रम जरी काहीसा कमजोर राहिलेला असला, तरी गिलच्या कर्णधारपदाखाली (Shubman gill) इतिहास बदलण्याची संधी संघाकडे आहे.

यासाठी काही बदल करणं गरजेचं असणार आहे. या सामन्यासाठी अभिमन्यू ईश्वरनला (Abhimanyu Ishwarn) संधी दिली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही तो टीम इंडियाच्या स्क्वॉडचा भाग होता, पण त्याला एकही सामना खेळता आला नव्हता. त्यानंतर इंग्लंडमध्येही त्याला स्क्वॉडमध्ये ठेवण्यात आलं आहे, मात्र पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत दुसऱ्या सामन्यात साई सुदर्शनच्या (Sai surdarshan) जागी त्याला खेळवता येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ईश्वरनचा घरगुती क्रिकेटमधील विक्रम साईपेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे आणि तो सातत्याने धावा करत आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---