पुणे, 20 ऑगस्ट 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित 60व्या राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत पाचव्या फेरीत पुण्याचा ग्रँड मास्टर अभिमन्यु पुराणिक, पीएसपीबीच्या सेतुरामन एसपी, दिप सेनगुप्ता, पश्चिम बंगालच्या मित्रभा गुहा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून 5 गुणांसह संयुक्तरीत्या आघाडी प्राप्त केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीत अभिमन्यु पुराणिकने काळी मोहरी घेऊन खेळताना सायंतन दास विरुध्द अत्यंत सफाईदार चालींच्या साहाय्याने विजय मिळवला. अभिमन्युने डावाच्या सुरुवातीपासून वर्चस्व गाजवून सलग पाचव्या विजयाची नोंद करताना एकुण 5 गुणाची कमाई केली.
महाराष्ट्राच्या कॅडेट मास्टर कैवल्य नागरेने आपली आश्चर्यकारक वाटचाल कायम राखताना आपल्या पेक्षा सरस मानांकित आतंरराष्ट्रीय मास्टर नीलाश सहाला बरोबरीत रोखले. 2071 मानांकन असलेल्या कैवल्यला 2435रेटिंग असलेल्या सहा विरुध्द डावाच्या मध्यांनतर विजयाचीही संधी होती. त्याला अखेर बरोबरीवर समाधान मानावे लागले असले तरी कैवल्यच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान उचंवली आहे.
दुसऱ्या पटावर सेतुरामन एसपीला पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना सुद्धा ग्रँड मास्टर विघ्नेश एनआर विरुध्द विजय मिळवताना कडवी झुंज द्यावी लागली. सेतुरामनने डावाच्या मध्यावर एक घोडचूक केली होती. त्यामूळे त्याच्या समोर पराभवाचा धोका उभा राहिला होता. परंतु विघ्नेशला त्याचा फायदा घेता आला नाही.
ग्रँडमास्टर मित्रभा गुहा आणि अग्रमानांकित ग्रँड मास्टर अभिजीत गुप्ता यांनी पाचव्या फेरीचे सामने सहज जिंकले. मित्रभाने काळी मोहरी घेऊन खेळताना आपला प्रतिस्पर्धी प्रवीण कुमारच्या राजाला वजीर आणि हत्तीच्या साहाय्याने कोंडीत पकडले. त्यामुळे प्रवीण कुमारने शरणागती पत्करली. अभिजीत गुप्ताने एस कृष्णन राम विरुध्द पांढरी मोहरी घेऊन खेळताना वेगवान चालींच्या साहाय्याने झटपट विजय मिळवला. (Abhimanyu Puranik, Sethuraman SP, Deep Sengupta, Mitrabha Guha joint top in National Chess Championship 2023)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पाचवी फेरी: व्हाईट व ब्लॅक या नुसार:
सायंतन दास(4गुण)(आरएसपीबी)पराभुत वि.अभिमन्यू पुराणिक(5गुण)(एएआय);
सेतुरामन एसपी(5गुण)(पीएसपीबी)वि.वि विघ्नेश एनआर(4गुण)(आरएसपीबी);
प्रवीण, कुमार सी(4गुण)(तामिळनाडू)पराभुत वि. मित्रभा, गुहा(5गुण)(पश्चिम बंगाल);
इनियान पी(4गुण)(तामिळनाडू)पराभुत वि.दीप सेनगुप्ता(5गुण)(पीएसपीबी);
सूर्य शेखर गांगुली(4.5गुण)(पीएसपीबी)वि.वि.सोहम कामोत्रा(3.5गुण)(जम्मू व कश्मीर);
दिप्तयन घोष (4.5गुण)(पश्चिम बंगाल)वि.वि.कोंगुवेल पोन्नुस्वामी (3.5गुण)(पीएसपीबी);
आरोण्यक घोष (4.5गुण)(आरएसपीबी)वि.वि सुयोग वाघ(3.5गुण)(महा);
श्यामनिखिल पी(4.5गुण)(आरएसपीबी)वि.वि.अभिषेक केळकर(3.5गुण)(महा);
दीपन, चक्रवर्ती जे(4.5गुण)(आरएसपीबी)वि.वि.धनंजय एस(3.5गुण)(छत्तीसगढ);
कैवल्य नागरे(4गुण)(महा)बरोबरी वि.नीलाश साहा(4गुण)(आरएसपीबी);
व्यंकटेश एमआर(4.5गुण)(पीएसपीबी)वि.वि.श्रीराज भोसले(3.5गुण)(महा);
भूपनाथ(4गुण)(बिहार)बरोबरी वि.अनुज श्रीवात्री(4गुण)(मध्यप्रदेश);
विष्णू, प्रसन्न. व्ही(4.5गुण)(तामिळनाडू)वि.वि.निर्णय गर्ग(3.5गुण)(हरियाणा);
कोल्ला भवन(4.5गुण)(आंध्रप्रदेश)वि.वि.नितीन एस.(3.5गुण)(आरएसपीबी);
अभिजीत गुप्ता (4गुण)(पीएसपीबी)वि.वि.राम, एस. कृष्णन (3गुण)(बीएसएनएल);
कार्तिक, कुमार सिंग(3गुण)(महा)पराभुत वि.विशाख एनआर(4गुण)(आरएसपीबी);
महत्वाच्या बातम्या –
मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध खुल्या वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत राघव पावडे, तीर्थ कोद्रे, रिजुल कुरडे संयुक्तरित्या आघाडीवर
IREvsIND । बुमराहच्या नेतृत्वात गोलंदाजांचे कहर प्रदर्शन! अर्शदीपच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद