पुणे, 20 ऑगस्ट, 2023: कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरी अखेर राघव पावडे, तीर्थ कोद्रे, रिजुल कुरडे या खेळाडूंनी आपापल्या गटात 5 गुणांसह आघाडी प्राप्त केली.
मिलेनियम स्कुल, कर्वेरोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीत 8 वर्षाखालील गटात अव्वल मानांकित
राघव पावडेने आयुश जगतापचा पराभव करून 5गुणांची कमाई केली. तीर्थ कोद्रेने निवान अगरवालवर विजय मिळवत 5 गुण मिळवले.10 वर्षाखालील गटात रिजुल कुरडेने श्री भोंगचा पराभव करून 5गुण मिळवले.
याआधी स्पर्धेचे उद्घाटन एमसीएचे उपाध्यक्ष ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालिका मृणालिनी कुंटे, चीफ आरबीटर नितीन शेणवी, अभिषेक केळकर आणि विनिता श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पाचवी फेरी:8 वर्षाखालील गट:
राघव पावडे(5गुण) वि.वि.आयुश जगताप(4गुण);
तीर्थ कोद्रे (5गुण) वि.वि.निवान अगरवाल(4गुण);
आरोही मुचलांबे (3गुण) पराभुत वि. सोहम गोखले(4गुण);
शाळवे चास्कर (4गुण) वि.वि.आदित्य भंडारी (3गुण);
अर्जून कौलगुड (3.5गुण) बरोबरी वि. विराट दोडके (3.5गुण);
10 वर्षाखालील गट:
क्षितीज प्रसाद(4.5गुण) बरोबरी वि. कविश लिमये (4.5गुण);
श्री भोंग(3.5गुण) पराभुत वि. रिजुल कुरडे (5गुण);
तनिश गांगल (3.5गुण) बरोबरी वि.ऋतम मोहगावकर (3.5गुण);
नैतिक माने(3गुण) पराभुत वि. पीवाय इशान अर्जुन(4गुण);
विहान देशमुख(4गुण) वि.वि.चिराग रेड्डी (3गुण);
12 वर्षाखालील गट:
चतुर्थी परदेशी(4.5गुण) बरोबरी वि. शर्विन बडवे (4.5गुण);
सृजन बोरकर (4गुण) बरोबरी वि. अभिजय वाळवेकर (4गुण);
स्पर्श बात्रा (4गुण) वि.वि.ओजस देवगडे (3.5गुण );
कृष्णा वंदनापू(4गुण) वि.वि.आयुष महुरकर (3गुण);
सम्राज्ञी पाटील(4गुण) वि.वि.आयुश कुमार(3गुण);
14 वर्षाखालील गट:
हितांश जैन(4.5गुण) बरोबरी वि. प्रतीती खंडेलवाल (4.5गुण);
ओजस रत्नावत (3गुण) पराभुत वि. आरुश बडजादे (4.5गुण);
अनय उपलेंचावर (4.5गुण) वि.वि.शिवम पेठकर (3गुण);
अनिक भट्टाचार्जी(4गुण) वि.वि.अन्वय माळी (3गुण).
महत्वाच्या बातम्या –
बी-लव्ह कॅंडीने उंचावली लंका प्रीमियर लीगची ट्रॉफी! मॅथ्यूजची कॅप्टन्स इनिंग
ऋतू-रिंकूच्या धमाक्यानंतर गोलंदाजांची कमाल! आयर्लंडला मात देत टीम इंडियाचा मालिकाविजय