Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रेयसला कर्णधार बनवण्यासाठी आणखी एक माजी क्रिकेटपटू आग्रही; म्हणाला…

January 4, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Shreyas Iyer

Photo Courtesy: bcci.tv


सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार या मुद्द्यावर अनेकदा चर्चा होताना दिसते. टी20 विश्वचषकात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे दिले जाण्याची‌ शक्यता आहे. तसेच, पुढील एका वर्षात भारतीय संघाच्या वनडे व कसोटी कर्णधारपदाबद्दलही निर्णय घेतला जाऊ शकतो. यामध्ये सातत्याने अनेक माजी क्रिकेटपटू श्रेयस अय्यर याचे नाव घेताना दिसत आहेत. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे.

श्रेयस अय्यर मागील दीड वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरीमुळे संघाचा नियमित सदस्य आहे. तसेच तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व ही करतो. त्यात संघाच्या प्रशिक्षकांपैकी एक असलेल्या माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर याने श्रेयसचे कौतुक केले. तसेच तो भारतीय संघाच्या पुढील कर्णधारपदासाठी योग्य असल्याचे देखील म्हटले. नायर म्हणाला,

“श्रेयस हा नैसर्गिकच नेता आहे. त्याच्याकडे त्या सर्व रणनिती व खेळाची समज असल्याचे दिसून येते.‌ भारताचा पुढील कर्णधार म्हणून तो नक्कीच दावेदार असेल.”

यापूर्वी अजय जडेजा व काही अन्य माजी क्रिकेटपटूंनी देखील त्याला कर्णधार करण्याविषयी बोलले होते.

अय्यर याच्यासाठी 2022 वर्ष चांगले गेले. 2022 मध्ये 1609 धावांसह तो सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज बनला. त्याने या वर्षात 5 कसोटी सामने खेळताना 60.28 च्या सरासरीने 422 धावा केल्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता.‌ यात त्याने 92 धावांची सर्वोच्च खेळी केली. भारताचा पुढील कसोटी कर्णधार म्हणून रिषभ पंत व केएल राहुल यांच्या नावाची चर्चा होते. तसेच, इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटीत जसप्रीत बुमराह याने देखील भारतीय संघाचे नेतृत्व केलेले.

(Abhishek Nayar Backs Shreyas Iyer As Future India Captain)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतबाबत मोठी अपडेट! स्टार विकेटकीपरवर पुढील उपचार मुंबईमध्ये होणार
INDvSL: विकेट घेण्यात हार्दिक अपयशी, मात्र नोंदवला अनोखा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कॅप्टन


Next Post
Sarfaraz-Khan

बीसीसीआय आता तरी ऐका, नाहीतर सरफराज तोडेल दरवाजा! पठ्ठ्याने रणजीत पुन्हा ठोकले शतक

Umran, Gill & Kishan vs SL

'त्याच्यात खूप टॅलेंट मात्र...', स्वस्तात बाद झालेल्या भारतीय खेळाडूची दिग्गजाने लावली क्लास

Sachin Tendulkar and Virat Kohli

विराट-सचिनबद्दल हे काय बोलून गेला संगकारा? म्हणाला, "भारतीयांना हे दोघे..."

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143