मुंबईचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरने यावर्षीच्या देशांतर्गत क्रिकेट मोसमात पाँडिचेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाँडिचेरी यावर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करणार आहे.
नायरने मुंबईकडून 99 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यामुळे पाँडिचेरीकडून तो जेव्हा पहिला सामना खेळेल तेव्हा तो त्याचा 100 वा प्रथम श्रेणी सामनाही आसणार आहे.
मुंबईकडून एनओसी मिळाल्यानंतर नायरने पाँडिचेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्याने ट्विटकरुन माहिती दिली आहे.
त्याने ट्विट केले आहे की ” मुंबई ते पाँडिचेरी. सर्वांना धन्यवाद ज्यांनी मला मदत केली आणि 14 वर्षांखालील क्रिकेटपासून ते 99 प्रथम श्रेणी सामन्यांपर्यंत जे माझ्या या खडूस क्रिकेटच्या 20 वर्ष प्रवासाचे भाग होते. हा माझ्यासाठी सन्मान होता.”
याबरोबरच या ट्विटमध्ये नायरने पुढे म्हटले आहे की त्याच्यासाठी हा भावनिक क्षण असला तरी मी आनंदी आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचा लोगो असलेला सिंह माझ्या हृदयात नेहमीच गर्जना करत राहिल.
MUMBAI >>>PUDUCHERRY…thank you everyone who has helped me and been part of this wonderful 20 years of khadoos cricket,right from the u14s to 99firstclass games..it's been an honour????.it's an emotional moment for me but I leave a happy man.the lion shall always roar in my ????.
— abhishek nayar (@abhisheknayar1) August 20, 2018
नायरने त्याच्या निर्णयाबद्दल म्हणाला, “मी पाँडिचेरीशी चर्चा केली आहे. शनिवारी मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून माझे एनओसी घेतले आणि आज सकाळी बीसीसीआयकडे तो सुपुर्त केला आहे.”
तसेच तो म्हणाला, हा कठीण निर्णय नव्हता. त्याने फक्त विचार केला की तो यासाठी काय करु शकतो आणि पाँडिचेरीच्या संघातून कसे योगदान देऊ शकतो. त्यामुळे त्याने हा निर्णय घेण्याआधी थोडा वेळ घेतला.
नायरने पाँडिचेरीकडून खेळण्याचा निर्णय का घेतला याबद्दल सांगितले, “हा संघ नवीन आहे, नवीन संस्कृती आहे आणि मी कोणाची जागा घेत नसल्याचे मुख्य कारण होते.”
“मला अशा संघात जायचे होते जिथे मी कोणाचीही जागा घेणार नाही. मला आनंद वाटत आहे.”
याबरोबरच भारताचे माजी गोलंदाज अविष्कर साळवी आणि प्रविण तांबे हे पाँडिचेरीचे सपोर्ट स्टाफमध्ये असतील.
नायरने त्याच्या कारकिर्दीत भारताकडून तीन वनडे सामनेही खेळले आहेत. तसेच 99 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 45.74 च्या सरासरीने 5,627 धावा केल्या आहेत. यात त्याने 13 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत. याचबरोबर 32.21 च्या सरासरीने 164 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने डिसेंबर 2005 मध्ये तमिळनाडू विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याने त्याचा शेवटचा प्रथम श्रेणी क्रिकेट सामना आंध्रप्रदेश विरुद्ध खेळला आहे.
नायरच्या या निर्णयाबद्दल भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मानेही भावनिक ट्विट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://twitter.com/ImRo45/status/1031483245836337152
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीचा आजच्या दिवसातील ७वा मोठा पराक्रम
–पुजारा बाद तर झाला परंतु इंग्लंडला टेन्शन देऊन गेला
–बापरे! २०१४ला एका धावेसाठी झगडणाऱ्या विराटने २०१८ला केला अजब कारनामा






