गाैतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला दोन नवे असिस्टंट कोच मिळाले आहेत. हेड कोच झाल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना गाैतम गंभीर यांनी सोमवारी (22 जुलै) माहिती दिली. श्रीलंका दाैऱ्यावर असिस्टंट कोच म्हणून जाणाऱ्या या दिग्गज क्रिकेटरांसोबत गाैतम गंभीर यांच्या सोबत काम केला आहे. त्यांच नाव अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट. भारतीय संघ लवकरच श्रीलंका दाैऱ्यालर रवाना झाली आहे. टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये 27 जुलै पासून टी20 मालिकेला सुरुवात होईल.
राहुल द्रविड यांच्या कार्यकाळानंतर 9 जुलै रोजी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या गौतम गंभीरने 22 जुलै रोजी पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कोचिंग स्टाफबाबत महत्त्वाची माहिती दिली. गंभीरने सांगितले की, माजी अष्टपैलू अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट हे श्रीलंका दौऱ्यावर सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका निभावतील. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू साईराज बहुतुले श्रीलंका दौऱ्यावर प्रभारी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत असतील. टी. दिलीप हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेला जाणार आहेत. टी दिलीप देखील टी20 विश्वचषक जिंकलेल्या संघात त्याच भूमिकेत होते. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ वाढणार असल्याचे मानले जात आहे.
गौतम गंभीर म्हणाला, ‘सध्या कोचिंग स्टाफचे सार हेच आहे. श्रीलंका दौरा संपल्यानंतर आम्ही त्यास अंतिम स्वरूप देऊ. भारत-श्रीलंका मालिकेनंतर आम्हाला वेळ मिळेल. अभिषेक (नायर) हे सहाय्यक प्रशिक्षक आणि रायन टेन डोशेट हे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. आशा आहे की दोघेही त्यांच्या नवीन भूमिकांमध्ये यशस्वी होतील, असे गंभीरने सांगितले. साईराज बहुतुले व टी.दिलीप यांच्या टीमसोबत जाणार आहेत. रायन टेन डोशेट कोलंबो येथे संघात सामील होणार आहे.
खर तरं, अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या कोचिंग स्टाफचे सदस्य होते. केकेआर साठी अभिषेक नायर असिस्टंट कोच, रायन टेन डोशेट फिल्डिंग कोच तर गाैतम गंभीर मेंटाॅर होता.
महत्त्वाच्या बातम्या-
संजू, रुतुराज, अभिषेक शर्माच्या निवडीवर अजित आगरकरचं खळबळजनक वक्तव्य!
‘फॅब फोर’च्या शर्यतीत विराट पडला मागे, जो रुटची मोठी आघाडी; लारा-द्रविडचा विक्रमही धोक्यात
लवकरच होणार या वेगवान गोलंदाजाचं भारतीय संघात पुनरागमन; अजित आगरकर यांनी केला मोठा खुलासा