भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवार पासून (27 सप्टेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा व शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ पाहुण्यांना 2-0 ने क्लिन स्वीप देण्याच्या तयारीत असेल. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले 2 गुण वाढवण्याचाही भारतीय संघाला मनसुबा असेल. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट पसरले आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी पावस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान भारताचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी सांगितले की की, दुसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टी आणि हवामानानुसार प्लेइंग इलेव्हनची निवड केली जाईल.
नायर यांनी गुरुवारी सामनापूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की, “बांगलादेशवर आघाडी मिळवून भारतीय संघ कानपूरला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत मालिका क्लीन स्वीप करण्याचे आमचे ध्येय असेल. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे. परंतु संघाची रणनीती बहुतांशी हवामानावर अवलंबून असेल. अशा परिस्थितीत संघाला उपयुक्त ठरणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान मिळेल.”
पुढे त्यांनी स्पष्ट केले की, “घरच्या मालिकेसाठी भारतीय संघात उपकर्णधाराची विशेष गरज भासत नाही. भारतीय संघात रिषभ पंत, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि जसप्रीत बुमराह असे अनेक खेळाडू आहेत जे आपल्या अनुभवाच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीत संघाचे नेतृत्व करू शकतात.”
सरफराजला संधी देण्याबाबत नायर म्हणाले की, “सरफराजने गेल्या मालिकेत चांगला खेळ केला आहे. संघाच्या गरजेनुसार त्याला संधीही मिळू शकते. ग्रीन पार्क स्टेडियमची खेळपट्टी योग्य खेळपट्टी आहे. यावर रोमांचक सामना अपेक्षित आहे. विराट आणि रोहितच्या अनुभवाचा फायदा संघाला मिळत आहे.”
भारताचा 15 सदस्यीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल, सरफराज खान, यश दयाल , ध्रुव जुरेल
हेही वाचा-
“पंत उत्कृष्ट खेळाडू, तो ऑस्ट्रेलियासाठी खेळायला हवा होता”, मार्शकडून कौतुकाचा वर्षाव
रिषभ पंतची आरसीबीच्या कर्णधारपदावर नजर? यष्टीरक्षकाने सर्वकाही खरं सांगून टाकलं
21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन, रोहित-धोनी सारख्या अनेक दिग्गजांना मिळाली नाही जागा!