भारतीय क्रिकेट संघ आणि दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल एक्सवर एका वापरकर्त्याची चांगलीच कानउघडणी केली आहे. या तरुणाने म्हटले होते की, पंत याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) व्यवस्थापनाशी पुढील कर्णधार होण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र, त्याला फ्रँचायजीने नकार दिला. यानंतर आता पंतने त्या तरुणाला आपले स्त्रोत तपासण्याचे सुचवले.
राजीव नावाच्या या वापरकर्त्याने लिहिले होते की, ‘रिषभ पंतने आरसीबीशी संपर्क साधला. पंतने या आठवड्याच्या सुरुवातीला त्याच्या व्यवस्थापकामार्फत आरसीबीशी संपर्क साधला. कारण, त्याला तेथे कर्णधारपद दिसत होते. मात्र, आरसीबीच्या व्यवस्थापनाने त्याला नकार दिला. विराट कोहलीला पंत त्याच्या भारतीय संघातील व दिल्ली संघातील डावपेच्यांमुळे संघात नको आहे.’
यावर उत्तर देताना पंतने लिहिले, ‘खोटी बातमी! तुम्ही सोशल मीडियावर एवढ्या खोट्या बातम्या का पसरवता? जरा समजूतदार व्हा. विनाकारण अविश्वासार्ह वातावरण निर्माण करू नका. ही पहिली वेळ नाही आणि शेवटचीही नाही. मात्र, मला हे सांगावे लागले. कृपया नेहमी तुमच्या तथाकथित स्त्रोतांना पुन्हा तपासा. दररोज हे सर्वात वाईट होत आहे. बाकी हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे फक्त तुमच्यासाठी नाही तर चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांसाठी आहे.’
दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर आयपीएल ही पंतची पहिली मोठी स्पर्धा होती. पंत याने आयपीएल 20240 मध्ये कॅपिटल्सचे नेतृत्व केले. त्याने 13 सामन्यांमध्ये 446 धावा केल्या आणि नाबाद 88 च्या सर्वोत्तम खेळीसह 3 अर्धशतके ठोकली. दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरले असताना, पंतच्या दमदार कामगिरीमुळे त्याने भारताच्या टी20 विश्वचषक 2024 संघात स्थान मिळवले. त्यानंतर भारतीय संघाला विजेता बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता.
हेही वाचा –
21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन, रोहित-धोनी सारख्या अनेक दिग्गजांना मिळाली नाही जागा!
रिकी पाँटिंग येताच पंजाब किंग्जच्या दोन खास सदस्यांचा रामराम, एका भारतीयाचाही समावेश
विराट कोहली विरुद्ध जो रुट वादात युवराज सिंगची उडी! सांगितलं कोणता खेळाडू सर्वोत्तम