---Advertisement---

ZIM vs IND: फक्त 16 धावांची गरज! अभिषेक शर्मा रचू शकतो मोठा इतिहास

On: गुरूवार, जुलै 23, 2026 6:46 AM
---Advertisement---

आज (23 जुलै) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माकडे एक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. जर त्याने चांगली कामगिरी केली, तर तो विराट कोहली आणि केएल राहुलसारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत सामील होऊ शकतो.

25 वर्षीय अभिषेक शर्माला जो सध्या आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 16 धावांची गरज आहे. जर त्याने पहिल्या टी-20 सामन्यात हा टप्पा गाठला, तर 200 किंवा त्यापेक्षा कमी डावांमध्ये 6000 टी-20 धावा पूर्ण करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल.

अभिषेक शर्माने आतापर्यंत 203 टी-20 सामने खेळले असून 199 डावांमध्ये 5984 धावा केल्या आहेत. जर त्याने पहिल्या टी-20 सामन्यात 16 धावा केल्या, तर तो आपल्या 200व्या डावात 6000 धावांचा टप्पा गाठेल आणि सर्वात कमी डावांमध्ये हा टप्पा गाठणारा चौथा भारतीय फलंदाज बनेल.

सध्या, भारतासाठी सर्वात कमी डावांमध्ये 6000 टी-20 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर आहे, ज्याने 166 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. विराट कोहलीने 184 डावांमध्ये, तर शुबमन गिलने 185 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

भारतासाठी 6000 टी-20 धावा गाठण्यासाठी लागलेले सर्वात कमी डाव:

केएल राहुल – 166 डाव
विराट कोहली – 184 डाव
शुभमन गिल – 185 डाव

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 6000 धावा करण्याचा जागतिक विक्रम वेस्ट इंडीजचा माजी आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने केवळ 162 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर पाकिस्तानचा बाबर आझम (165 डाव) आणि भारताचा केएल राहुल (166 डाव) यांचा क्रमांक लागतो. शॉन मार्श आणि डेव्हन कॉनवे या दोघांनीही 180 डावांमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी लागलेले सर्वात कमी डाव:

ख्रिस गेल – 162 डाव
बाबर आझम – 165 डाव
केएल राहुल – 166 डाव
शॉन मार्श – 180 डाव
डेव्हन कॉनवे – 180 डाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---