---Advertisement---

पंजाब किंग्जविरुद्ध फिफ्टी करताच अभिषेकचा वर्ल्ड रेकॉर्ड! आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज

On: शनिवार, एप्रिल 11, 2026 5:56 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार, ११ एप्रिल) पहिला सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये हैद्राबादने प्रथम फलंदाजी करताना सुरूवातच स्फोटक केली. त्यांचा सलामावीर अभिषेक शर्मा याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने एक विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

आयपीएलमध्ये २० पेक्षा कमी चेंडूत पाच अर्धशतके करणारा अभिषेक पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने सामन्याच्या पाचव्या षटकात पंजाबच्या विजयकुमार वैशाखच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आयपीएलच्या मागील हंगामातही एकदा १६ चेंडूत, एकदा १८ चेंडूत आणि दोनदा १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

चंडीगडच्या मुल्लाणपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात अभिषेक २८ चेंडूत ७४ धावा करत बाद झाला. त्याने आयपीएलमध्ये अनेकदा जलद अर्धशतके झळकावली आहेत. त्याने २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध १६ चेंडूत, २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध १८ चेंडूत, २०२६ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध १८ चेंडूत, २०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध १९ चेंडूत आणि २०२४ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहेत.

आयपीएलमध्ये २० पेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक आयपीएल अर्धशतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेकनंतर निकोलस पूरनचा क्रमांक लागतो. त्याने चार वेळा ही कामगिरी केली आहे. तसेच जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रेविस हेड आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी तीन वेळा आयपीएलमध्ये २० पेक्षा कमी चेंडूत अर्धशतके केली आहेत.

आयपीएलमध्ये २० पेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक अर्धशतके-
५ – अभिषेक शर्मा (दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैद्राबाद)
४ – निकोलस पूरन (मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैद्राबाद, लखनऊ सुपर जायंट्स)
३ – जेक फ्रेझर-मॅकगर्क (दिल्ली कॅपिटल्स)
३ – ट्रेविस हेड (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैद्राबाद)
३ – वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---