झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात शतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्मानं एक मोठा खुलासा केला आहे. या सामन्यात तो शुबमन गिलच्या बॅटनं खेळला असल्याचं त्यानं सांगितलं. असं करण्यामागे अभिषेकनं मोठं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला की, जेव्हा जेव्हा त्याला वाटतं की त्याच्यावर दबाव आहे आणि त्याला कामगिरी करावी लागेल, तेव्हा तो शुबमनची बॅट वापरतो.
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मानं शानदार खेळी केली. त्यानं अवघ्या 47 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं 100 धावा केल्या. अभिषेक शर्मा पदार्पणाच्या सामन्यात फ्लॉप ठरला होता. त्याला खातंही उघडता आलं नाही. पण त्यानं आपल्या दुसऱ्या सामन्यातच शतक झळकावून सर्व टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
सामना संपल्यानंतर अभिषेक शर्मानं खुलासा केला की, तो शुबमन गिलच्या बॅटनं खेळत होता. त्यामुळेच त्याला शतक झळकावता आलं. अभिषेक म्हणाला, आम्ही दोघांनी खेळायला सुरुवात केली तेव्हा सुमारे 10-11 वर्षांचे होतो. आम्ही आमच्या अंडर-12 दिवसांपासून एकत्र खेळत आहोत. आम्हा दोघांचंही एकमेव लक्ष्य भारताकडून खेळण्याचं होतं. मी याआधीही सांगितलं होतं की, शुबमन गिलनं मला माझ्या निवडीबद्दल माहिती दिली होती. त्याला खूप आनंद झाला होता. मी आज त्याच्या बॅटनं खेळलो. मला बॅट दिल्याबद्दल त्याचं विशेष आभार. मी माझ्या अंडर-12 दिवसांपासून हे करत आहे. जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की माझ्यावर दबाव आहे किंवा मला या सामन्यात कामगिरी करावी लागेल, तेव्हा मी त्याची बॅट घेतो. आयपीएलमध्येही मी त्याची बॅट घेतली होती.”
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा करावा लागला होता. परंतु दुसऱ्या सामन्यात टीम इंडियानं 100 धावांनी विजय मिळवत शानदर कमबॅक केला. या विजयात सर्वात महत्त्वाचं योगदान अभिषेक शर्माचं होतं, ज्यानं अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावलं.
महत्त्वाच्या बातम्या –
एक शर्मा गेला, दुसरा शर्मा आला! झिम्बाब्वेविरुद्ध युवराजच्या शिष्याचा कहर
रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा! आगामी आयसीसी स्पर्धांसाठी दिलं अपडेट
“महाराष्ट्र सरकारसाठी सर्व खेळ समान नाहीत”, स्टार बॅडमिंटनपटूचा गंभीर आरोप