---Advertisement---

“महाराष्ट्र सरकारसाठी सर्व खेळ समान नाहीत”, स्टार बॅडमिंटनपटूचा गंभीर आरोप

---Advertisement---

भारतीय क्रिकट संघानं 2024 टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर संघावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र सरकारनं टी20 विश्वचषक विजेत्या संघात समावेश असलेल्या राज्यातील 4 खेळाडूंना प्रत्येकी 1-1 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली, ज्यावरून आता घमासान माजलंय. देशातील अव्वल बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी यानं यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

टी20 विश्वचषक संघात महाराष्ट्राचे चार खेळाडू होते. कर्णधार रोहित शर्माशिवाय सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल हे ते 4 खेळाडू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चारही खेळाडूंना 1-1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. मात्र देशाचा दिग्गज बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीच्या मते, क्रिकेटपटूंना जो मान मिळतो तो त्याला मिळाला नाही.

चिराग शेट्टीनं 2022 साली ‘थॉमस कप’ जिंकला होता. ही बॅडमिंटनची सांघिक स्पर्धा आहे, जिला या खेळाचा विश्वचषक मानलं जातं. ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना चिराग शेट्टी म्हणाला, “थॉमस कप जिंकणं म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्यासारखं आहं. मी इंडोनेशियामध्ये थॉमस कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होतो. संघात मी महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू होतो. महाराष्ट्र सरकार विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंचा आदर करू शकत असेल तर त्यांनी आमच्या मेहनतीचाही आदर केला पाहिजे. सरकारनं सर्व खेळांना समान वागणूक दिली पाहिजे.”

चिराग शेट्टी पुढे बोलताना म्हणाला की, तो सुद्धा क्रिकेटप्रेमी आहे, परंतु राज्य सरकारनं सर्व खेळ समान पातळीवर ठेवले पाहिजे. चिराग म्हणाला, “मी क्रिकेटच्या विरोधात नाही. आम्ही सर्व बॅडमिंटनपटूंनी टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना टीव्हीवर पाहिला आणि विजयाचा आनंदही साजरा केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शानदार विजयाचा आम्हाला अभिमान आहे. त्याचप्रमाणे आम्हीही यश मिळवलंय. पण आम्हाला रोख बक्षीस देणं सोडा, सरकारनं आमचा साधा सत्कारही केला नाही. 2022 पूर्वी भारत कधीच उपांत्य फेरीत पोहोचला नव्हता, पण आम्ही इतिहास रचला”.

चिराग शेट्टीनं आतापर्यंत जिंकलेले पदकं –
वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022 – कांस्य पदक
थॉमस कप 2022 – सुवर्ण पदक
गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स 2018 – रौप्य पदक
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 – सुवर्ण पदक
हँगझोऊ आशियाई खेळ 2023 – सुवर्ण पदक
आशियाई चॅम्पियनशिप (मिश्र संघ) 2023 – कांस्य पदक
गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स (मिश्र संघ) 2018 – सुवर्ण पदक
हँगझोऊ आशियाई खेळ (मिश्र संघ) 2023 – सुवर्ण पदक
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स (मिश्र संघ) 2022 – रौप्य पदक

महत्त्वाच्या बातम्या – 

एक शर्मा गेला, दुसरा शर्मा आला! झिम्बाब्वेविरुद्ध युवराजच्या शिष्याचा कहर
टी20 विश्वचषक फायनलनं अवघ्या 24 तासात मोडले सर्व रेकॉर्ड! आयसीसीनं जाहीर केली आकडेवारी
रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा! आगामी आयसीसी स्पर्धांसाठी दिलं अपडेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---