---Advertisement---

IPL 2026: अभिषेक शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम; रोहित शर्मा आणि संजू सॅमसनलाही टाकलं मागे

On: सोमवार, एप्रिल 13, 2026 10:11 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 चा 21 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान परागने (Riyaan Parag) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या नजरा हैदराबादची स्फोटक जोडी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यावर होत्या, मात्र चाहत्यांची मोठी निराशा झाली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात अभिषेक शर्मा झेलबाद झाला आणि एकही धाव न काढता (डक) त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या ‘डक’मुळे अभिषेक शर्माच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

2026 हे वर्ष त्याच्यासाठी अत्यंत खराब ठरले असून, तो आता एका वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी रोहित शर्मा (2018 मध्ये 6 वेळा) आणि संजू सॅमसन (2024 मध्ये 6 वेळा) संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर होते. मात्र, अभिषेकने 2026 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 18 सामन्यांपैकी 7 वेळा शून्यावर बाद होऊन या दोघांनाही मागे टाकले आहे. विशेष म्हणजे या 7 पैकी 4 वेळा तो पहिल्याच चेंडूवर (गोल्डन डक) बाद झाला आहे.

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये नंबर 1 वर असलेल्या अभिषेक शर्मासाठी (Abhishek Sharma) हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरत आहे. त्याने या वर्षात 18 डावांमध्ये 26.58 च्या सरासरीने केवळ 452 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर एकही शतक नाही, तर त्याने 5 अर्धशतके झळकावली आहेत. टी-20 वर्ल्ड कपपासून तो सातत्याने फॉर्मसाठी झगडताना दिसत असून त्याच्या या कामगिरीमुळे क्रिकेट वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.

एका वर्षात सर्वाधिक वेळा ‘शून्य’वर बाद होणारे भारतीय खेळाडू

अभिषेक शर्मा: 7 डक (18 डाव, 2026)
रोहित शर्मा: 6 डक (32 डाव, 2018)
संजू सॅमसन: 6 डक (32 डाव, 2024)
गुरकीरत सिंह मान: 5 डक (19 डाव, 2013)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---