---Advertisement---

IND vs NZ: अभिषेक शर्माचा धमाका! ठोकलं न्यूझीलंडविरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक, राहुलचा जुना विक्रम मोडीत

On: बुधवार, जानेवारी 21, 2026 9:29 PM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) फलंदाजीने जोरदार कोहराम माजवला. नागपूरच्या मैदानावर या डावखुऱ्या फलंदाजाने वादळी शैलीत फलंदाजी करत अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक ठोकले.

अभिषेकने आपले खातेच षटकाराने उघडले आणि न्यूझीलंडच्या बॉलिंग अटॅकशी अक्षरशः खेळ केला. संजू सॅमसन (Sanju Samson and Ishaan kishan) आणि इशान किशन स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले असूनही अभिषेकची शानदार फलंदाजी सुरूच राहिली. त्याने ठोकलेले न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून हे सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे.

टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. संजू सॅमसन 2 चौकार मारल्यानंतर 10 धावा काढून बाद झाला. त्यानंतर इशान किशन सुद्धा 8 धावा काढून आऊट झाला. मात्र, अभिषेकवर याचा काही खास फरक पडला नाही आणि त्याने एका बाजूने आपली ताबडतोब फलंदाजी सुरूच ठेवली. चौकारांपेक्षा जास्त अभिषेक षटकारांमध्ये डील करताना दिसला.

अभिषेकने आपले अर्धशतक फक्त 22 चेंडूत पूर्ण केले. डावखुऱ्या फलंदाजासमोर न्यूझीलंडचा मजबूत बॉलिंग अटॅक पूर्णपणे हतबल दिसला. अभिषेकने 35 चेंडूंचा सामना करत 84 धावांची तडाखेबंद खेळी खेळली. आपल्या या इनिंग दरम्यान त्याने 5 चौकार आणि 8 गगनचुंबी सिक्स लगावले.

अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक लावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अभिषेकने केएल राहुलचा विक्रम चक्काचूर केला आहे. राहुलने 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 23 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. याचबरोबर टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वात जास्त वेळा 25 पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही अभिषेक टॉपवर पोहोचला आहे. त्याने हा पराक्रम 8 व्यांदा करून दाखवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---