---Advertisement---

IND vs NZ: अभिषेकचं वादळ! न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये ऐतिहासिक खेळीसह मोडले अनेक विक्रम

On: रविवार, मार्च 8, 2026 9:01 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने (Mitchell Santner) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण स्पर्धेत ज्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्या अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) फायनलमध्ये आपल्या फलंदाजीने धावांची त्सुनामी आणली. अभिषेकने 52 धावांची धडाकेबाज खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली.

सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये खेळपट्टीचा अंदाज घेतल्यावर अभिषेकने तिसऱ्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या 18 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह तो टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात नॉकआउट सामन्यात (सेमीफायनल/फायनल) सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला आहे. त्याने इंग्लंडच्या जॅकब बेथेलचा 19 चेंडूंचा विक्रम मोडीत काढला.

नॉकआउट सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक (टी-20 वर्ल्ड कप इतिहास)
अभिषेक शर्मा (भारत): 18 चेंडू वि. न्यूझीलंड (2026)
जॅकब बेथेल (इंग्लंड): 19 चेंडू वि. भारत (2026)
फिन ॲलन (न्यूझीलंड): 19 चेंडू वि. दक्षिण आफ्रिका (2026)
युवराज सिंग (भारत): 20 चेंडू वि. ऑस्ट्रेलिया (2007)
माइक हसी (ऑस्ट्रेलिया): 22 चेंडू वि. पाकिस्तान (2010)

पॉवरप्लेमध्ये (पहिल्या 6 षटकांमध्ये) सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अभिषेकने भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) विक्रमाची बरोबरी केली आहे. 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 51 धावा केल्या होत्या, आज अभिषेकनेही न्यूझीलंडविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 51 धावा ठोकल्या.

भारतासाठी सर्वात वेगवान टी-20 वर्ल्ड कप अर्धशतके

युवराज सिंह 12 इंग्लंड 2007
अभिषेक शर्मा 18 न्यूझीलंड 2026
के.एल. राहुल 18 स्कॉटलंड 2021
रोहित शर्मा 19 ऑस्ट्रेलिया 2024
युवराज सिंग 20 ऑस्ट्रेलिया 2007
ईशान किशन 20 नामिबिया 2026

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---