---Advertisement---

भारत-न्यूझीलंड संघातील टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये वापरला जाणार ड्यूक चेंडू; जाणून घ्या या चेंडूची खासियत

On: गुरूवार, मार्च 11, 2021 12:58 AM
---Advertisement---

भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची ४ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता अंतिम सामन्यात भारताची गाठ न्यूझीलंड संघाशी पडणार आहे. न्यूझीलंडने यापूर्वीच अंतिम सामन्यात जागा पक्की केली होती. त्यामुळे पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचा मान भारत आणि न्यूझीलंडला मिळाला आहे.

हा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमधील साउथँम्पटन येथील रोज बाऊल स्टेडियमवर खेळवला जाईल. खरंतर हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार होता. मात्र, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता हा सामना लॉर्ड्सवरुन साउथँम्पटन येथे हलवण्यात आला.

हा सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात येणार असल्याने अर्थातच या सामन्यासाठी ड्यूक चेंडूचा वापर होण्याचीच दाट शक्यता आहे. इंग्लंडमध्ये होणारे बहुतांश सामने हे ड्यूक कंपनीच्या चेंडूनेच खेळवले जातात. तर आपण आज या चेंडूबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

ड्यूक चेंडूबद्दल थोडेसे…

साल १७६० पासून ड्यूक क्रिकेट चेंडू बनवायला सुुरुवात झाली. या चेंडूचे उत्पादन टॉनब्रिज येथे सुरु झाले. हे चेंडू हाताने तयार केले जातात. इंग्लंडमध्ये कसोटी, वनडे आणि टी२० साठी ड्यूक कंपनीचे चेंडू वापरले जातात. तसेच हा चेंडू बनवताना त्याला लाखेचा लेपही दिला जातो. त्यामुळे हा कसोटीसाठी वापरण्यात येणार हा चेंडू गडद लाल रंगाचा दिसतो.

इंग्लंडच्या वातावरणामध्ये अन्य दुसऱ्या चेंडूंच्या तुलनेत ड्यूक चेंडूला अधिक वळण मिळते. तसेच चेंडूची चमक लवकर जात नसल्याने हे चेंडू खेळताना फलंदाजाची परिक्षा पाहिली जाते. हा चेंडू जूना झाल्यावर गोलंदाजांना रिवर्स स्विंग मिळतो. त्यामुळे इंग्लंडमध्ये या चेंडूचाच बऱ्याचदा वापर केला जातो.

सध्या या चेंडूचे उत्पादन करणाऱ्या ब्रिटीश क्रिकेट बॉल्स लिमिटेड या कंपनीची मालकी भारतीय वंशाच्या दिलीप जजोदिया यांच्याकडे आहे. त्यांनी १९८७ साली या कंपनीची मालकी स्विकारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आजच्या दिवशी: शेन वॉर्नला तंबूत धाडताच हरभजनचे नाव क्रिकेट इतिहासात ‘असा’ पहिलाच भारतीय म्हणून नोंदवले गेले

रोहित शर्माचा पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झालेल्या सुर्यकुमार आणि इशान किशनला खास सल्ला; म्हणाला…

‘तयारी झाली! १२ तारखेची आणखी वाट पाहू शकत नाही’, भारतीय खेळाडूने फुकले टी२० मालिकेचे रणशिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---