---Advertisement---

‘तयारी झाली! १२ तारखेची आणखी वाट पाहू शकत नाही’, भारतीय खेळाडूने फुकले टी२० मालिकेचे रणशिंग

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान शुक्रवारपासून (१२ मार्च) पाच टी२० सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (पूर्वीचे मोटेरा स्टेडियम) खेळविले जातील. या मालिकेसाठी दोन्ही संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या या मालिकेतून पुनरागमन करेल. आपल्या सरावाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून शेअर करत, त्याने आपण आगामी मालिकेसाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार मालिका

कसोटी मालिकेत ३-१ असे यश मिळवल्यानंतर, भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान ५ टी२० सामन्यांच्या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होईल. मालिकेतील सर्व सामने जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडतील. या मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व अनुभवी ओएन मॉर्गन करेल. तसेच, भारतीय संघात देखील काही नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

हार्दिकने शेअर केला व्हिडिओ

भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. मागील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळलेल्या टी२० मालिकेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. त्या मालिकेत हार्दिक मालिकावीर ठरला होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी आपण तयार असल्याचे म्हणत, हार्दिकने आपल्या सरावाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये, हार्दिक उत्तुंग फटके मारताना दिसतोय. तसेच, गोलंदाजी करतानाही हार्दिक तंदुरुस्त असल्याचे दिसत आहे. हार्दिकने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले, ‘तयारी झाली. १२ मार्चची आणखी वाट पाहू शकत नाही.’

हार्दिक दुखापतीमुळे सध्या नियमितपणे गोलंदाजी करत नाही. मात्र, व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हार्दिक आगामी मालिकेत गोलंदाजी करताना दिसू शकतो.

भारताचा नवोदित संघ
आगामी टी२० मालिकेत भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात मैदानात उतरेल. त्यासह शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या या अनुभवी फलंदाजांचा संघात समावेश आहे. ईशान किशन, सूर्यकुमार यादव व राहुल तेवतिया यांना प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले असून, वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, टी नटराजन व नवदीप सैनी या अनुनभवी गोलंदाजांवर असेल. फिरकीपटू म्हणून युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल कामगिरी पार पाडतील.

महत्त्वाच्या बातम्या –

राष्ट्रीय संघ सोडून आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना व्हावी शिक्षा, इंग्लंडच्या ‘या’ माजी कर्णधाराची मागणी

टी२० मालिका: अवघ्या ७ धावांत ६ विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम करणारा ‘तो’ गोलंदाज घेणार बुमराहची जागा?

Video: अश्विन,पंड्या आणि कुलदीप पाठोपाठ आता ‘या’ महिला क्रिकेटपटूंचेही प्रसिद्ध तमिळ गाण्यावर थिरकले पाय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---