---Advertisement---

राष्ट्रीय संघ सोडून आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना व्हावी शिक्षा, इंग्लंडच्या ‘या’ माजी कर्णधाराची मागणी

On: बुधवार, मार्च 10, 2021 10:09 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला येत्या ९ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी इंग्लंडचे खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठी पूर्ण वेळ उपस्थित असतील, असे म्हटले होते.

त्यानंतर चेन्नई संघाचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन याने देखील म्हटले आहे की, “जर चेन्नई सुपर किंग्स संघाने प्लेऑफ मध्ये प्रवेश केला तर मी न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही.”

यामुळे आता माजी इंग्लिश कर्णधार जोफ्री बॉयकॉट यांनी आयपीएल खेळणाऱ्या इंग्लंड संघाच्या खेळाडूंवर टीका करत इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडे (इसीबी) तक्रार केली आहे.

याचे कारण असे की, येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंड संघ न्यूझीलंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. तसेच ३० मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. अशातच अंतिम सामन्यात पोहोचणाऱ्या संघाकडून खेळणाऱ्या इंग्लिश खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागू शकते.

त्यामुळे बॉयकॉट यांनी इसीबीकडे राष्ट्रीय संघाला प्राधान्य न देता आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंबद्दल तक्रार केली आहे. तसेच त्यांना शिक्षा करावी आणि वेतनात कपात करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही संघात २ जून पासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. तसेच आयपीएलचा अंतिम सामना ३० मे रोजी असणार आहे. यासोबतच मालिकेतील दुसरा कसोटी सामना १० ते १४ जूनला खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड संघाकडून बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मोइन अली, ओएन मॉर्गन, जोस बटलर यांसोबतच १३ खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळणार आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये जो संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल त्या संघातील इंग्लिश खेळाडू न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी उपलब्ध नसतील. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने देखील खेळाडूंना संपूर्ण आयपीएल स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

टी२० मालिका: अवघ्या ७ धावांत ६ विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम करणारा ‘तो’ गोलंदाज घेणार बुमराहची जागा?

दु:खद! कारकीर्दीत ५६० गडी बाद करणाऱ्या इंग्लंडच्या गोलंदाजाचे निधन

Video: अश्विन,पंड्या आणि कुलदीप पाठोपाठ आता ‘या’ महिला क्रिकेटपटूंचेही प्रसिद्ध तमिळ गाण्यावर थिरकले पाय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---