• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

जेव्हा शेन वॉर्नला तंबूत धाडताच हरभजनचे नाव क्रिकेट इतिहासात ‘असा’ पहिलाच भारतीय म्हणून नोंदवले गेले

शेन वॉर्न झेलबाद होताच हरभजन सिंगने एक इतिहास रचला. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय ठरला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
डिसेंबर 24, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Harbhajan Singh Twitter Post

Photo Courtesy: Harbhajan Singh Twitter Post


‘क्रिकेट’ हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी एक म्हणून गणला जातो. याचं कारणही तितकंच खास आहे. मैदानी खेळ असूनही मैदानावर उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला क्रिकेट ‘आवड’ म्हणून जपता येतं. म्हणूनच, क्रिकेट येत असो अथवा नसो, ते पाहण्याचा आनंद घेत क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्या जगात सध्या तरी अगणीत अशीच आहे.

कुतुहूल, थरार, आनंद, दुःख, राग, आदर अशा अनेक भावनांना सोबत घेऊन क्रिकेट पुढे जात राहिलंय. तसेच, क्रिकेटमध्ये घडलेल्या अनेक घटनांना आठवणींच्या कुपीत बंदिस्त करुन ठेवणे सर्वांनाच आवडतं. क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने काहीना काही विक्रम, पराक्रम, लहान-मोठ्या घडामोडी घडतच असतात. याच घडामोडी पुढे जाऊन आठवणी बनून राहतात.

क्रिकेटमधील अशाच काही आठवणींना आपण दररोज ‘इतिहासात डोकावून’ प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत. दिनविशेषाच्या भाषेत सांगायचं झाल्यास आजच्याच दिवशी क्रिकेट इतिहासात घडलेले पराक्रम आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत.

आज आपण ज्या पराक्रमाची आठवण ‘महा स्पोर्ट्स’च्या सर्व प्रेक्षकांना करुन देत आहोत, तो विक्रम वाचताना प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल. आणि या पराक्रमाचा शिलेदारही आहे, लाखो क्रिकेटरसिकांचा लाडका भज्जी म्हणजेच हरभजन सिंग हाच.

याच हरभजनने एकदा आपल्या फिरकीवर कांगारुंना अक्षरशः नाचवलं होतं. तो सामना, तो क्षण आजही प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या स्मृतीपटलावर जसच्या तसा ताजा आहे. चला तर पाहूयात हरभजन सिंहचा तो ‘भीमपराक्रम’.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना, २००१

कोलकाता येथे भारत आणि ऑस्ट्रेलिा यांच्यात २००१ साली कसोटी सामना सुरु होता. हा सामना तसा अनेकार्थाने ऐतिहासिक आहे. मात्र, आजच्याच दिवशी म्हणजेच दिनांक ११ मार्च रोजी त्या सामन्यात हरभजन सिंगने पराक्रम केला होता, तो पराक्रम म्हणजे भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा पहिलाच खेळाडू म्हणून भज्जीने त्याचे नाव इतिहासात नोंदवले होते.

Special day in my life 11/3/2001 Hattrick day 🙏 https://t.co/YS6JqcLE4c

— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) March 11, 2020

असा रंगला होता सामना…

सन २००१ सालची ती कसोटी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या फॉलोऑन नंतरच्या भागीदारीसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याच कसोटीच्या पहिल्या डावात हरभजनने हॅट्रिक घेतली होती. त्याने या सामन्यात पहिल्या डावातील ७२ व्या षटकात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे रिकी पॉन्टिंग, ऍडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना सलग बाद केलं होतं. त्याने पान्टिंग आणि गिलख्रिस्टला पायचीत केले होते. तर शेन वॉर्नला झेलबाद केले होते. वॉर्नचा झेल सदागोपन रमेशने घेतला होता.

त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. तर भारताला पहिल्या डावात १७१ धावांवर रोखत फॉलोऑन दिला होता. त्यावेळी लक्ष्मणच्या २८१ आणि द्रविडच्या १८० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने दुसरा डाव ६५७ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियाला ३८४ धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ २१२ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे भारताने १७१ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात हरभजनने एकूण १३ विकेट्स घेतल्या होत्या आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं


Previous Post

समालोचक की प्रशिक्षक? काय आहे रवी शास्त्रींचा फ्युचर प्लॅन? स्वतः दिले उत्तर

Next Post

एकवेळ वाटलेलं कधी कसोटी खेळायलाही मिळणार नाही, आता तोच बनलाय भारताचा उपकर्णधार

Next Post
KL-Rahul-and-Rohit-Sharma

एकवेळ वाटलेलं कधी कसोटी खेळायलाही मिळणार नाही, आता तोच बनलाय भारताचा उपकर्णधार

टाॅप बातम्या

  • हेडची विकेट काढताच जड्डूने कसोटीत रचला इतिहास! ‘असा’ विक्रम रचणारा बनला पहिलाच भारतीय
  • अजिंक्यच्या ‘फायटिंग इनिंग’नंतर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट, म्हणाली, “मला अभिमान वाटतो”
  • BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद
  • लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण
  • व्वा, काय उडी मारली! क्रिकेटच्या मैदानावर केविन सिंक्लेअर बनला ‘जिमनास्ट’, व्हिडीओ व्हायरल
  • इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
  • “शाब्बास खेळत रहा”, ओव्हलवर महाराष्ट्र पुत्र अजिंक्य-शार्दुलचे मराठीतून संभाषण, हा व्हिडिओ पाहाच
  • WTC FINAL: अजिंक्यच्या बोटाला दुखापत! दुसऱ्या डावात करणार का फलंदाजी? स्वतः दिले उत्तर
  • शार्दुलने सार्थ केले ‘लॉर्ड’ नाव! पठ्ठ्याने थेट ब्रॅडमन यांची केली बरोबरी
  • धोनीच्या दोन वाक्यांनी बदलला अजिंक्यचा माईंडसेट! आयपीएलपाठोपाठ गाजवली WTC फायनल
  • पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
  • “अजिंक्य संघासाठी काहीही करू शकतो”, माजी प्रशिक्षकांनी गायले रहाणेचे गोडवे
  • “आम्ही 450 धावांचा पाठलाग करू”, लॉर्ड शार्दुलने व्यक्त केला आशावाद
  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In