इंग्लंड संघ सध्या पाकिस्तानविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लडने यजमान पाकिस्तानला मात दिली होती. पण दुसऱ्या सामन्यात त्यांचा संघ अडचणीत दिसत आहे. याचे कारण ठरला पाकिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज अबरार अहमद. अबरारने मालिकेतील या दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करून इंग्लंड संघाच्या अडचणी वाढवल्या आहेत. याचसोबत त्याने भारतीय दिग्गज रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांचे विक्रम देखील मोडीत काढले आहेत.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना मुलतान याठिकाणी खेळला जात आहे. इंग्लंडने दुसऱ्या डावात 275 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. यामध्ये अबरार अहमद (Abrar Ahmed) याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी सामन्याच्या पहिल्या डावात अबरार अहमदने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या होत्या. अबरारच्या फिरकीच्या जाळ्यात अडकल्यामुळे इंग्लंड संघ पहिल्या डावात 281, तर दुसऱ्या डावात 202 धावा करू शकला. अबरार अहमदसाठी हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पदार्पणाचा सामना होता, ज्यामध्ये त्याने एकूण 11 विकेट्स घेतल्या.
अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा दुसरा गोलंदाज बनला अबरार अहमद
अबरार अहमदच्या विक्रमाचा विचार केला, तर तो कसोटी पदार्पणाच्या सामन्यात 11 विकेट्स घेणारा पाकिस्तानचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद जाहिद यांनी 1996 मध्ये रावलपिंडी कसोटी सामन्यात अशीच कामगिरी केली होती. जाहिदने 1996 मध्ये रावलपिंटीमध्ये कसोटी पदार्पण केले आणि या सामन्यात एकूण 11 विकेट्स घेतल्या होत्या.
अबरारने अश्विन आणि शमीलाही टाकले मागे
दरम्यान, भारतीय संघाचा दिग्गज रविचंद्रन अश्विम (Ravichandran Ashwin) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) यांचे विक्रम देखील अबरार अहमदकडून मोडीत निघाले आहेत. अश्विन आणि शमी अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत आणि अहमदकडून त्यांना मोठा धक्का मिळाला आहे. शमी आणि अश्विनने त्यांच्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात प्रत्येकी 9-9 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता अबरार 11 विकेट्सह त्यांच्या पुढे गेला आहे.
कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज भारतीयच
असे असले तरी, कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वा जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम एका भारतीयाच्याच नावावर आहे. भाराचे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवानी यांच्या 1988 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्यांनी 16 विकेट्स घेतल्या होत्या. (Abrar Ahmed breaks Ravichandran Ashwin and Mohammed Shami’s record of on his Test debut)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलाम तुझ्या समर्पणाला! 3 दिवसांपूर्वी पडले होते 4 दात, आता पुनरागमन करत संघाला बनवले विजयी
सुखी संसाराची 5 वर्षे पूर्ण! लग्नाच्या वाढदिवशी अनुष्कासाठी विराटची खास पोस्ट; म्हणाला, ‘मी धन्य झालो…’