सध्या यूएईमध्ये १९ वर्षाखालील आशिया चषक (under 19 asia cup 2021-22) खेळला जात आहे. भारताच्या १९ वर्षाखालील संघाने (india u19 team) आशिया चषकातील पहिल्या सामन्यात यूएईला पराभूत केले होते. पण दुसऱ्या सामन्यात संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये (india u19 vs pakistan u19) शनिवारी (२५ डिसेंबर) आमना सामना झाला. पाकिस्तान संघाने या सामन्यात दोन विकेट्स राखून भारताला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानने या सामन्यात शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. यापूर्वी टी२० विश्वचषकातही पाकिस्तानने भारतावर ऐतिहासिक विजय मिळवला होता.
सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला भारतीय संघ ५० षटके संपेपर्यंत मैदानात टिकू शकला नाही. भारतीय संघ पाकिस्तानी गोलंदाजांसमोर ४९ षटकांमध्ये २३७ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे लक्ष्य ८ विकेट्सच्या नुकसानावर आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर गाठले.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघातील केवळ एक फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज अराध्य यादवने ८३ चेंडूत सर्वाधिक ५० धावा केल्या. यामध्ये त्याच्या तीन चौकारांचा समावेश होता. तसेच सलामीवीर हरनूर सिंगने ५९ चेंडूत ४६ धावा केल्या आणि यामध्ये त्याच्या सहा चौकारांचा समावेश होता. कर्णधार यश धूल शून्य धावांवर बाद झाला, तर राजवर्धन हंगरगेकर ३३, कौशल तांबे ३२ आणि राज बावाने २५ धावांचे योगदान दिले.
After a spirited fightback that saw them recover from 14/3 to post 237, India U19 lost to Pakistan U19 on the final ball of the match by 2 wickets. #BoysInBlue #ACC #U19AsiaCup #INDvPAK
Up next: Afghanistan U19 on Monday.
📸 📸: ACC
Details ▶️ https://t.co/BKDyB2lSAp pic.twitter.com/OtYSxckSBu
— BCCI (@BCCI) December 25, 2021
पाकिस्तानच्या फलंदाजांचा विचार केला, तर मोहम्मद शहजादने १०५ चेंडूत ८१ धावा केल्या. यामध्ये त्याच्या चार चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. मोहम्मद शेहजादव्यतिरिक्त पाकिस्तानचा एकही फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला नाही, पण सर्वांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर पाकिस्तानने विजय मिळवला. पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल बंगालझाई शून्य धावा करून तंबूत परतला होता. माझ सद्दाक, रिजवान मोहम्मद आणि आझम खान यांनी प्रत्येकी २९ धावांचे योगदान दिले. तर इरफान खानने ३२ धावांची खेळी केली.
गोलंदाजीमध्ये पाकिस्तानच्या जिशान जमीरने १० षटकात ६० धावा खर्च केल्या आणि पाच महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर आवेश अली दोन विकेट्स घेतल्या. तसेच क्वासीम अक्रम आणि माझ सद्दाकने प्रत्येकी १ विकेट घेतली. भारतासाठी राज बावाने ५६ धावा खर्च करून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
रोहित तर आहेच, पण त्याच्यानंतर कोण? रवी शास्त्रींनी सांगितले भारताच्या कर्णधारपदाचे २ भावी उमेदवार
मला विसरलात, तर परत माझी आठवण करून देईल; ‘या’ खेळाडूचा आपल्याच क्रिकेट बोर्डाला टोला
‘अश्विन श्रीलंकेत जन्मला असता तर…’, आइसलंड क्रिकेटचे गमतीशीर ट्वीट सोशल मीडियावर ठरतेय चर्चेचा विषय
व्हिडिओ पाहा –