सध्या क्रिकेटविश्वात विश्वचषक 2023चे वारे वाहत आहेत. विश्वचषकाचा आगामी हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. स्पर्धेत सहभागी होणारे दहा संघ कसून सराव करत आहेत. शुक्रवारी (29 सप्टेंबर) विश्वचषकाचे सराव सामने देखील सुरू झाले. विश्वचषकासाठी वातावरणात उत्साह असतानाच दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज डेल स्टेन याने पाच गोलंदाजांची नावे सांगितली आहेत. स्टेनच्या मते हे पाच गोलंदाज आगामी विश्वचषकात सर्वोत्तम प्रदर्शन करतील.
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी दिग्गज डेल स्टेन (Dale Steyn) दोन वर्षाेंपूर्वी म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये त्याची गणना केली जाते. विश्वचषक 2023 साठी स्टेनने निवडलेल्या 5 सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये काही महत्वाच्या नावांचा समावेश नाहीये. भारताचा अनुभवी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), ऑस्ट्रेलियन दिग्गज मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांनी स्टेनने आपल्या यादीत स्थान दिले नाहीये.
डेल स्टेन याने आपल्या यादीत सर्वात आधी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याला जागा दिली आहे. सिराज सध्या आयसीसी वनडे क्रमावारीत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात देखील सिराजचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले. आश्चर्याची बाबर ही राहिली की, स्टेनने बुमराहच्या आधी सिराजला प्रधान्य दिले. बुमराह मोठा काळ दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानातून बाहेर, आशिया चषकात त्याचेही प्रदर्शन समाधानकारक राहिले.
https://www.instagram.com/reel/CxzX33PP1Vh/?utm_source=ig_web_copy_link
स्टेनने दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यालाही या यादीत स्थान दिले आहे. पाकिस्तानचा शाहीन शाह अफ्रिदी, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि इंग्लंडचा मार्ग बुड यांनाही या पाच गोलंदाजांमध्ये निवडले गेले आहे. शाहीन आफ्रिदीला निवडताना स्टेनने रोहित शर्मा याला शाहीनपासून सावथ राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ट्रेंट बोल्ट (Trent Boult) विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरू शकतो. (According to Dale Steyn, these five bowlers will put on a bang in World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
ना रोहित-विराट, ना बुमराह, ‘हा’ धुरंधर भारताला जिंकून देणार वर्ल्डकप; युवराजने घेतले हैराण करणारे नाव
आनंदाची बातमी! गुवाहाटीत थांबला पाऊस, भारत-इंग्लंड सामना होण्याची शक्यता कायम, ‘या’ वेळेपर्यंत पाहिली जाणार वाट