भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी त्या खेळाडूंची नावे सांगितली आहेत, ज्यांनी आयपीएल 2023मध्ये आपल्या प्रदर्शनाने प्रभावित केले. प्रसाद यांनी या खेळाडूंना त्यांनी भविष्यात भारतीय संघासठी टी-20 फॉरमॅटमध्ये केळण्यासाठी निवडले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही अनकॅप्ड खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला. माजी निवडकर्त्यांनी राजस्थान रॉयलस्लचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचे खास कौतुकही केले.
माध्यमांतील वृत्तांनुसार एमएसके प्रसाद (MSK Prasad) म्हणाले की, “यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), तिलक वर्मा (Tilak Varma) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांनी अप्रतिम प्रदर्शन केले. जितेश शर्माही नक्कीच भारताकडून व्हाईट बॉल क्रिकेट खेळू शकतो. ध्रुव जुरेल एक अप्रतिम फिनिशर राहिला आहे. निहाल वढेराही चांगले प्रदर्शन करू शकला. शिवम दुबेनेही चांगले प्रदर्शन केले आहे. भविष्यात या खेळाडूंना टी-20 आंतरराष्ट्रीय खेळताना आपण पाहू शकतो.”
दरम्यान, जयस्वालने यावर्षी आयपीएलमध्ये 14 सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने 163 धावा केल्या आहेत. जयस्वालने यावर्षी एक शतक आणि 5 अर्धशतके ठोकली आहेत. तसेच रिकू सिंग त्याने मारलेल्या सलग पाच षटकारांमुळे चर्चेत राहिला. रिंकूने केकेआरसाठी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात पाच षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर तो काही सामन्यांमध्ये संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडताना दिसला. रिंकून हंगामातील 14 सामन्यांमध्ये 474 धावा केल्या आहेत.
त्याव्यतिरिक्त प्रसाद यांनी तिलक वर्मा, निहाल वढेरा, ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांचेही कौतुक केले. त्यांच्या मते ध्रुव भविष्यात भारताचा फिनिशर बनू शकतो. जितेशही मर्यादित षटाकांच्या संघात जागा मिळवू शकतो. (According to former India chief selector MSK Prasad, ‘these’ players will play for India in the future)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! जसप्रीत बुमराह लवकरच करतोय पुनरागमन, वेगवान गोलंदाजाकडूनच मिळाले संकेत
चेन्नईच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून हार्दिकसेनेला धोका! फायनलमध्ये चमकले तर गुजरातच्या स्वप्नाचा होईल चुराडा