भारत आणि पाकिस्तान हे कट्टप प्रतिस्पर्धी संघ आहेत. पण मागच्या काही वर्षांपासून भारतीय संघाचे पारडे पाकिस्तानपेक्षा जड दिसले आहे. वनडे विश्वचषकात पाकिस्तानला एकदाही भारताला पराभूत करता आले नाहीये. याच पार्श्वभूमीवर गौतम गंभीर याने मोठे विधान केले आहे. गंभीरच्या मते भारत आणि ऑस्ट्रेलिया ही सर्वात मोठी रायवलरी आहे.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन शेजारी राष्ट्र असून क्रिकेटच्या मैदानात दोन्ही संघांमध्ये नेहमीच संघर्ष पाहायला मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने असले, तर चाहत्यांमध्येही वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. या दोन संघात वनडे विश्वचषकाचा उपांत्य सामना, तर टी-20 विश्वचषकाता अंतिम सामना देखील खेळला गेला आहे. असे असले तरी, मागच्या काही वर्षात या दोन संघात द्वीपक्षीय मालिका खेळल्या गेल्या नाहीत. तसेच भारताला विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धांमध्ये बहुतांश वेळा भारताचे पारडे जड दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने हे विधान केले.
गौतम गंभीर नुकताच एका कार्यक्रमात म्हणाला, “पाकिस्तान संघ अनेकदा भारतावर भारी पडला आहे. वर्तमानात जर पाहिले, तर भारत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये पाकिस्तानपेक्षा चांगले प्रदर्शन करत आहे. जर पाकिस्तान संघाने भारताला हरवले, तर हा उलटफेर ठरतो. त्याउलट भारताने पाकिस्तानला हरवले, तर थे अपेक्षित असते. क्रिकेटच्या दृष्टीकोणातून पाहिले तर भारत आणि ऑस्ट्रेलिया ही सर्वात मोठी रायवलरी आहे. तुम्ही कोणत्यारी क्रिकेट चाहत्याला विचारले, तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियालाच सर्वात मोठी रायवलरी म्हणतो.”
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ मागच्या काही वर्षांमध्ये जबरदस्त प्रदर्शन करताना दिसले आहेत. या दोन संघांमधील सामन्यांमध्ये अनेकदा दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते. तसेच बॉर्डर गावसकर ट्रॉफीदरम्यान भारताने मायदेशातच नाही तर ऑस्ट्रेलियामध्येही चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या मागच्या हंगामात आणि नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक या दोन्ही स्पर्धांचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रे्लियामध्ये खेळला गेला. भारतीय संघाला या दोन्ही वेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. (According to Gautam Gambhir, India’s arch rival is not Pakistan but Australia)
महत्वाच्या बातम्या –
बाय बाय 2023 । महिलांचा ऐतिहासिक विजय, रिंकूचे पाच षटकार आणि शमीचा कहर, ‘हे’ आहेत वर्षातील पाच अविस्मरणीय क्षण
गिलने ‘ही’ गोष्टीवर नियंत्रणात मिळवले पाहिजे, कसोटीत यश मिळवण्यासाठी मिळाला दिग्गजाचा सल्ला