---Advertisement---

मोहम्मद शमीला मिळू शकते बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी खेळण्याची संधी?

On: रविवार, ऑक्टोबर 27, 2024 8:47 PM
Mohammed-Shami
---Advertisement---

सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दरम्यान भारतीय संघाची आगामी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीसाठी (Border Gavaskar Trophy) घोषणा झाली. या मालिकेत संघात काही युवा खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. पण भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) तंदुरूस्त नसल्यामुळे भारतीय संघात स्थान मिळाले नाही. पण आता चर्चा होऊ लागल्या आहेत की, शमी तंदुरूस्त झाला, तर त्याला भारतीय संघात स्थान मिळेल का?

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) भारतीय संघात समावेश करण्यात आला नाही. शमी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपर्यंत तंदुरुस्त राहू शकेल आणि त्याची संघात निवड होईल, अशी अटकळ यापूर्वी बांधली जात होती. मात्र, भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा त्यात शमीचे नाव नव्हते. आता शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग होऊ शकेल का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

मोहम्मद शमीबद्दल (Mohammed Shami) बोलायचे झाले, तर तो गेल्या 1 वर्षापासून भारतीय संघाबाहेर आहे. 2023च्या विश्वचषकादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो एकही सामना खेळला नाही. तो आयपीएल 2024 आणि टी20 विश्वचषक 2024चा भाग नव्हता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तो तंदुरुस्त होण्याची शक्यता होती. शमीने स्वतः सांगितले होते की, तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी खूप मेहनत घेत आहे. बंगळुरू येथे भारत-न्यूझीलंड संघातील कसोटी सामन्यादरम्यानही तो मैदानात गोलंदाजी करताना दिसला होता. यानंतर त्याच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली होती. मात्र, संघ जाहीर झाला तेव्हा त्यात शमीचे नाव नव्हते.

शमी पूर्णपणे तंदुरुस्त नाही, त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही. मात्र, रिपोर्ट्सनुसार शमीला अजूनही बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, जर शमीने रणजी ट्रॉफीमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि फिटनेस सिद्ध केला, तर त्याला संघात स्थान मिळू शकते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शमी कर्नाटकविरूद्धच्या सामन्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याने येथे पूर्ण क्षमतेने गोलंदाजी केली आणि त्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही, तर भारतीय संघात त्याचा समावेश होऊ शकतो.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर

महत्त्वाच्या बातम्या-

पीसीबीने जाहीर केली केंद्रीय करार यादी, ‘अ’ श्रेणीत फक्त 2 खेळाडू; बाबर-रिझवान कोणत्या श्रेणीत?
‘या’ 5 संघांकडून भारत घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा पराभूत!
“गौतम गंभीर लवकरच…” भारताच्या पराभवानंतर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---