रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशा अंतराने नावावर केली. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित यजमान भारताला इंग्लंडकडून पराभव मिळाला होता. पण शेवटच्या चारही सामन्यांमध्ये भारताने बाजी मारली. धरमशाला कसोटी भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या म्हणजे शनिवारी (9 मार्च) दुसऱ्याच सत्रात निकाली लावली. धरमशालेत मिळालेल्या विजयानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने रोहितला मालिका जिंकण्याचे श्रेय दिले.
मागच्या दोन वर्षांपासून रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार आहे. त्याच्या नतेृत्वात भारताने अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या आहेत. मागच्या वर्षी त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघ एकही सामना न गमावता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत गेला होता. रोहितचे वैयक्तिक प्रदर्शन आणि नेतृत्वगुण मागच्या दोन वर्षात संघासाठी फायद्याचे ठरले आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्या मते रोहितने ड्रेसिंग रुममधील वातावरण खराब होऊ दिले नाही, म्हणूनच भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध जिंकू शकला. द्रविड म्हणाला, “सर्व श्रेय रोहित शर्माला जाते. पहिल्या कसोटीत मिळालेल्या पराभवानंतर रोहितनेच ड्रेसिंग रुममधील वातावरण शांत आणि निवांत ठेवले.”
दरम्यान, रोहितने या मालिकेतील राजकोट कसोटीत 131 धावांची खेळी केली होती. तर इंग्लंडविरुद्ध रांची कसोटीत अर्धशतक (55) केले होते. धरमशाला कसोटीतही रोहितने पहिल्याच डावात शतक (103) केले. याच प्रदर्शनाचे जोरावर त्याने मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्याकडून स्वतःची पाठ थोपटवून घेतली. द्रविड म्हणाला, “रोहित शर्माचे या सामन्यातील प्रदर्शन अप्रतिम होते. राजकोट कसोटीत देखील पहिल्या तीन विकेट्स सुरुवातीच्या एकाच तासात भारताने गमावल्या. संघासाठी शतक करेल, असे कोणीतरी आम्हाला त्यावेळी हवे होते. रांची कसोटीत देखील रोहितची बॅच चांगली चालली.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तारत भारतीय संघाने पहिल्या डावात 477 धावांपर्यंत मजल मारली. 259 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला दुसऱ्या डावात 195 धावांवर गुंडाळले. परिणामी भारताने हा सामना एक डाव आणि 64 धावांनी नावावर केला.
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy : रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईसमोर विदर्भाचं कडवं आव्हान; श्रेयस अय्यरवर सर्वांच्या नजरा
IND Vs ENG : आता कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंवरही होणार पैशांचा वर्षाव, जय शहाकडून मोठी घोषणा