भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय सचिव जय शाह यांनी रोहित शर्मा याच्याविषयी नुकतेच एक विधान केले. आगामी टी-20 विश्वचषकात रोहित शर्माच भारताचा कर्णधार असेल, हे शहांच्या विधानातून स्पष्ट झाले. दुसरीकडे हार्दिक पंड्याकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. अशातच आता माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचीही प्रतिक्रिया समोर येत आहे.
रोहित शर्मा आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारताला अपयश मिळाल्यानंतर वर्षभर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. दरम्यानच्या काळात अनेक महत्वाच्या मालिका खेलल्या गेल्या. पण रोहित आणि विराट कोहली यांनी एकही टी-20 मालिका खेळली नाही. असे असले तरी, मागच्या वर्षीचा वनडे विश्वचषक झाल्यानंतर रोहित, विराट आणि त्याचसोबत जसप्रीत बुमराह यांनी टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. अशात जय शाह यांच्या मते रोहित आगामी टी-20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. जय शहांच्या या विधानानंतर हार्दिक पंड्या टी-20 संघाचा कर्णधार बनणार, अशा चर्चांना पूर्णविराम लागला. दुसरीकडे सौरव गांगुली यांनीही कर्णधार म्हणून रोहित सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगितले.
गांगुलीलने आगामी टी-20 विश्वचषकात रोहितकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्याच्या निर्णयाला समर्थन दर्शवले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गांगुली म्हणाला, “रोहित शर्मा टी-20 विश्वचषकात कर्णधार म्हणून योग्य पर्याय आहे. ज्या पद्धतीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि वनडे विश्वचषकात सगल 10 सामने जिंकले, त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्यामुळे रोहित सर्वोत्तम पर्याय आहे.”
भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात इंग्लंडने बॅझबॉल क्रिकेट खेळत भारताला मात दिली. पण शेवटच्या दोन सामन्यांमध्ये भारताने इंग्लंडच्या बॅझबॉल रणनीतीवर मात केली आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारी रोजी रांचीमध्ये सुरू होईल. गांगुलींच्या मते बॅझबॉल क्रिकेट भारतीय खेळपट्टीवर कामी येण्याची शक्यता फारच कमी आहे. अशात भारताने जर मालिका जिंकला नाही, तर ही आश्चर्याची बाब असेल.
महत्वाच्या बातम्या –
लोकसभा निवडणुकीसाठी शुबमन गिलवर मोठी जबाबदारी, नव्या भूमिकेत दिसणार युवा फलंदाज
Ranji Trophy 2024 । उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, एका क्लीकवर मिळवा सर्व अपडेट