भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएलमध्ये अजूनही सक्रियपणे सहभाग घेत आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलची दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझी बनली. यावर्षी धोनी त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळून निवृत्ती जाईर करण्याची शक्यता आहे. मागच्या मोठ्या काळापासून याविषयी चर्चा होत आहे. पण भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या मते धोनी आयपीएल 2024 मध्येही खेळू शकतो.
एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांनी आयपीएल (IPL) आणि भारतीय संघासाठी (Team India) मोठा काळ एकत्र क्रिकेट खेळले. दोघांनी एकत्र मिळून सीएसकेला चार आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या. 2021 साली सीएसकेने शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली होती आणि त्यावेळी रैना या संघाचा भाग होता. मागच्या वर्षी मात्र सीएसकेने रैनाला रिलीज केले. मागच्या आयपीएल हंगामात रैनाला खरेदी करण्यासाठी एकही संघ पुढे सरसावला नाही. परिणामी हा दिग्गज मागच्या आयपीएल हंगामात खेळू शकला नाही. सध्या सुरेश रैना लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेतील एक सामना संपल्यानंतर रैना माध्यमांशी बोलत होता.
आयपीएल 2024 मध्येही खेळणार एमएस धोनी?
माध्यमांसमोर सुरेश रैना म्हणाला, “एमएस धोनी पुढच्या वर्षीही आयपीएल खेळू शकतो. त्याचा फॉर्म चांगला आहे आणि चांगली फलंदाजीही करत आहे. पण हे सर्व यावर्षीच्या हंगामातील त्याच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल. तो आणि रायडू एक वर्ष क्रिकेट खेळले नसल्याने हे कठीणच असेल. माझ्या मते सीएसके संघ खूप मजबूत आहे. संघात ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे यांच्या रूपात काही युवा खेळाडू आहेत. सोबत बेन स्टोक्स देखील आहे. माझ्या शुभेच्छा संघासोबत आहेत. धोनीसोबत मी फोनवर बोलतच असतो. सध्या तो आयपीएलची जोरात तयारी करत आहे.”
दरम्यान, मागच्या काही आयपीएल हंगामांपासून एमएस धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा होत आल्या आहेत. आयपीएलचा आगामी हंगामा मात्र धोनीसाठी अखेरच असेल, अशी पूर्ण शक्यता आहे. कारण धोनी यावेळी त्याच्या होम ग्राउंडवर खेळणार आहे. धोनी यापूर्वीच आयपीएलमधून निवृत्ती ही होऊ ग्राउंडवर त्याच्या चाहत्यांपुढे घेईल, असे स्पष्ट केले होते. मागच्या तीन हंगामांमध्ये आयपीएल विदेशात आयोजित केल्याने धोनीला त्याच्या होम ग्राउंडवर खेळता आले नाही. पण यावर्षी तो आपल्या चाहत्यासमोर खेळून निवृत्ती जाहीर करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिनने केलं होतं ‘शतकांचं शतकं’
’15 वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नाही…’, विराटशी संवाद केल्यानंतर महिला आरसीबीने जिंकला पहिला सामना