भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मागच्या मोठ्या काळापासून संघाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करत आहे. रोहितच्या नेतृत्वातच टीम इंडिया यावर्षी वनडे विश्वचषकासाठी मैदानात उतरली आहे. विश्वचषक सुरू झाल्यापासूनच भारतीय संघ अप्रतिम फॉर्ममध्ये आला असून पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय देखील मिळवला. याच पार्श्वभूमीवर कर्णधार रोहितचेही कौतुक होत आहे. भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना यानेही रोहितच्या नेतृत्वाबाबत खास प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या मजेशीर आणि दिलखूलास स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्या पत्रकार परिषदा देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. रोहित अगदी कोणत्याही प्रश्नावर मजेशीर उत्तर देऊ शकतो, हे पत्रकारांनाही चांगलेच माहीत आहे. ड्रेसिंग रुममध्येही त्याचा हा स्वभाव पाहायला मिळतो. डिसेंबर 2021 मध्ये रोहित शर्मा विराट कोहली (Virat Kohli) नंतर संघाचा कर्णधार बनला. पुढे फेब्रुवारी 2022 मध्ये त्याकडे कसोटी संघाचेही नेतृत्व सोपवल गेले. मागच्या जवळपास दीड-दोन वर्षांपासून तो भारताचा पूर्णवेळ कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात संघ यांगले प्रदर्शन देखील करत आहेत.
रोहितच्या आधी एमएस धोनी (MS Dhoni) संघाचा कर्णधार असतानाही ड्रेसिंग रुममधील वातावरण खेळीमेळीचे असायचे, असे सांगितले जाते. अनेकांच्या मते रोहित देखील धोनीची ही परंपरा पुढे चालू ठेवत आहे. माजी दिग्गज सुरेश रैनाने याच पार्श्वभूमीवर खास विधान केले. रैना म्हणाला, “जेव्हाकधी मी संघातील खेळाडूंसोबत बोलतो, ते म्हणतात रोहितचा धोनीइतकाचा आदर आहे. ड्रेसिंग रुममध्ये रोहित खूप मैत्रिपूर्ण वातावरण ठेवतो, जे महत्वाचे आहे.”
दरम्यान, रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत खेळलेल्या 97 सामन्यांमध्ये संघाला 71 विजय, तर 23 पराभव मिळाले आहेत. दुसरीकडे एमएस धोनी याच्या नेतृत्वात खेळलेल्या 200 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 110 सामन्यांमध्ये भारताला विजय, तर 74 सामन्यांमध्ये पराभव मिळाला होता. विराटच्या नेतृत्वात भारताने एकूण 95 सामने खेळले. त्यातील 65 सामन्यांमध्ये भारत जिंकला असून 27 सामन्यांमध्ये संघाला पराभव मिळाला.
महत्वाच्या बातम्या –
विराट सचिनपेक्षा मोठा फलंदाज? जाणून घ्या ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या विधानामागचे कारण
पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार्कची लंकन फलंदाजाला ताकीद, चेंडू टाकण्यापूर्वीच निघालेला क्रीझच्या बाहेर; पाहा व्हिडिओ