वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ आत्तापर्यंत अजिंक्य आहे. यजमान भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यात एकतर्फी विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे. आता भारतीय संघ आपला चौथा सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल. या सामन्यासाठी रविवारी (15 ऑक्टोबर) भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे.
भारतीय संघाने शनिवारी अहमदाबाद येथे आपला तिसरा सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला सात गडी राखून पराभूत केले. त्यानंतर आता चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघ पुण्यात पोहोचला आहे. रविवारी दुपारी भारतीय संघाचे पुणे विमानतळावर आगमन झाले.
Team India has arrived in Pune for match against Bangladesh.
Virat Kohli and Rohit Sharma together arrived – What a lovely video..!!! pic.twitter.com/JUthsGYfnv
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 15, 2023
भारतीय संघ 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध आपला चौथा सामना खेळणार आहे. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमसीए स्टेडियमवर हा सामना होईल. बांगलादेश संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात एक विजय आणि दोन पराभव स्वीकारले आहेत.
Team India reached in pune a while ago. All the players and support staff boarded the team bus except Rohit Sharma and Virat Kohli. Both the players went separately and didn't board the team bus.
(REPORT – Ankan Kar)#INDvBAN #CWC23 #Pune #Rohitsharma #ViratKohli???? pic.twitter.com/iqhUhgeFLU
— Arshad Saifi (@ArshadS90573671) October 15, 2023
भारतीय संघाने चेन्नई येथे झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाने सात गडी राखून विजय मिळवलेला. तर पाकिस्तानला देखील भारताने सात गडी राखून नमवले.
(Team India Arrived In Pune For Fourth Match Against Bangaladesh In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
हम खडे, तो सबसे बडे! रोहितच्या 6 षटकारांनी रचला मोठा Record, सचिनसह स्वत:चे 3 विक्रम काढले मोडीत
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘या’ पठ्ठ्या ठरला फिल्डर ऑफ द मॅच, शार्दुलच्या हस्ते सन्मान






