---Advertisement---

ब्रेकिंग! टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल ठरला 2022 खेलरत्न पुरस्काराचा मानकरी

On: सोमवार, नोव्हेंबर 14, 2022 8:41 PM
Achanta Sharath Kamal
---Advertisement---

भारतीय क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. भारतीय क्रीडापटूंना दिला जाणारा सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyachand Khelratna Award) यावर्षी वरिष्ठ टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) याला देण्यात आला. मागील 24 वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे बक्षीस त्याला मिळाले आहे.

 

भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून सोमवारी (14 नोव्हेंबर) सर्व क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. कमल याला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले तर, इतर 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तसेच प्रशिक्षकांसाठीच्या द्रोणाचार्य पुरस्कारांची देखील घोषणा झाली. या पुरस्कारांचे वितरण 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन येथे होईल.

सध्या 40 वर्षांच्या असलेल्या कमलने सोळाव्या वर्षी व्यावसायिक टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती. 2004 अथेन्स ऑलिंपिकमध्ये त्याने भारताचे प्रथम प्रतिनिधित्व केलेले. त्याला आजवरचा भारताच्या टेबल टेनिस इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू मानले जाते. त्याच्या नावे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये तब्बल सात सुवर्ण पदके, तीन रौप्य पदके व तीन कांस्य पदके जमा आहेत. एशियन चॅम्पियनशिप व एशियन गेम्समध्ये देखील त्याने दोन कांस्य पदके जिंकलीत.

यावर्षी बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावलेले. तो तब्बल पाच ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव टेबल टेनिसपटू आहे.

भारतातील सर्वच क्रीडा पुरस्कार असलेल्या खेलरत्न पुरस्काराचे यापूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे नाव होते. मात्र, मागील वर्षी या पुरस्काराचे नामकरण भारताचे सर्वकालीन महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले गेले.

(Achanta Sharath Kamal Won 2022 Major Dhyanchand Khelratna Award)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’
पाकिस्तानचे नागरिकत्व घेतलेल्या सॅमीने सांगितले टीम इंडियाच्या पराभवाचे कारण; म्हणाला… 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---