भारताचा युवा वेटलिफ्टर अचिंता शेऊली याने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये रविवारी (३१ जुलै) रोजी इतिहास रचला. अचिंताचे वय सध्या २० वर्ष असून त्याने पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात भारातसाठी वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मधील भारतासाठी हे तिसरे सुवर्णपदक आहे आणि विशेष म्हणजे ही तिन्ही सुवर्ण पदके भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग खेळामध्ये मिळवली आहेत. आपल्या या सुवर्णपदकानंतर बोलताना अचिंताने एक मोठी प्रतिक्रिया दिली.
सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अचिंता म्हणाला,
“राष्ट्रकुल स्पर्धेत मला माझे सर्वोत्तम प्रदर्शन करायचे होते. मी हे करण्यात यशस्वी झालो. माझी कधीच कुणाशी स्पर्धा नव्हती. माझी स्पर्धा माझ्याशीच होती. मलेशियाचा खेळाडू मला झुंज देऊ शकला असता. पण मी ठरवले होते की, मला माझे सर्वोत्तम देऊन त्याला हरवायचे आहे. आता पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही मी याच वजनी गटात सहभागी होईल. तेथे देखील अशीच कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल.”
मागच्या वर्षी जागतिक जूनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत अचिंताने रौप्य पदक जिंकले होते. मुळचा पश्चिम बंगालचा असणारा अंचिता याने स्नॅचमध्ये १४३ किलोग्राम वजन उचलले, जो कॉमनवेल्थ गेम्समधील विक्रम ठरला आहे. तसेच क्लीन एंड जर्कमध्ये १७० किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्याने एकूण ३१३ किलो वजन उचलून कॉमवेस्थ गेम्साचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात ही जबरदस्त कामगिरी केली आहे. मलेशियाचा ई हिदायस मोहम्मद याने रौप्य पदक पटकावले, तर कॅनाडाचा शाद डारसिग्नी याने कांस्य पदक पटकावले. या दोघांनी अनुक्रमे ३०३ आणि २९८ किलोग्राम वजन उचलले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
CWG 2022 | कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलस्वारांनी सोडला ट्रॅक, पाहा भीषण अपघाताचा व्हिडिओ
न्यूझीलंड कर्णधाराच्या मनात निवृत्तीचा विचार? दिले स्पष्टीकरण
पहिल्या टी-२० विजयानंतर टीम इंडियाचा विशेष सन्मान, रोहितला मिळाले स्पेशल गिफ्ट