---Advertisement---

आर माधवनच्या पोराची कौतुकास्पद कामगिरी! एक-दोन सोडा, 5 सुवर्णपदक पटकावत उंचावली महाराष्ट्राची मान

On: रविवार, फेब्रुवारी 12, 2023 4:42 PM
Vedaant-Madhavan
---Advertisement---

काही व्यक्ती असे असतात, जे वेगवेगळ्या क्षेत्रात खूप नाव कमावतात. त्यांची मुलेदेखील वडिलांप्रमाणे स्वत:चे नाव मोठे करण्यासाठी धडपडतात. काहीजण वडिलांनी ज्या क्षेत्रात नाव कमावलंय, त्याच क्षेत्रात नशीब आजमावतात, तर काहीजण वडिलांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात नाव कमावतात. असेच काहीसे प्रसिद्ध अभिनेता आर माधवन याच्या मुलानेही करून दाखवले आहे. मध्यप्रदेश येथे खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये माधवनच्या मुलाने सुवर्ण कामगिरी करून दाखवली.

आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन (R Madhavan Son Vedaant Madhavan) याने जलतरण स्पर्धेत एकूण 7 पदके आपल्या नावावर केली. त्यात 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांचा समावेश आहे. वेदांत माधवन (Vedaant Madhavan) खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 (Khelo India Youth Games 2023) स्पर्धेत महाराष्ट्राचे (Maharashtra) प्रतिनिधित्व करत होता. मुलाच्या कामगिरीमुळे माधवन याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने ट्वीटद्वारे आनंद व्यक्त केला. यामध्ये त्याने केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर याच्यासह इतर लोकांनाही धन्यवाद दिला.

आर माधवनचे ट्वीट
आर माधवन (R Madhavan) याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “मी अपेक्षा फर्नांडिस आणि वेदांतचे प्रदर्शन पाहून खूपच खुश आहे. मी या क्षणी शिवराज सिंग चौहान आणि अनुराग ठाकूर यांच्यासह इतर व्यक्तींनाही धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी या स्पर्धेचे आयोजन इतक्या चांगल्या प्रकारे केले. मला आज खूप अभिमान वाटत आहे.”

याव्यतिरिक्त माधवनने दुसऱ्या ट्वीटमध्ये मुलाच्या यशाचा आनंदही व्यक्त केला. त्याने मुलाचा फोटो ट्वीट करत लिहिले की, “परमेश्वराच्या कृपेने 100 मीटर, 200 मीटर आणि 1500 मीटरमध्ये सुवर्ण, 400 मीटर आणि 800 मीटरमध्ये रौप्य पदक.”

यावेळी खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राकडून चांगले प्रदर्शन पाहायला मिळाले. तसेच, याचीही प्रशंसा करत माधवनने लिहिले की, “2 ट्रॉफी जिंकण्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. 1 ट्रॉफी जलतरण संघाने आण 2 सर्व चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जिंकली.”

वेदांतचे जलतरणात आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन
वेदांत माधवन याच्याबाबत बोलायचं झालं, तर 17 वर्षीय जलतरणपटू वेदांत माधवन याने आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन जलतरण स्पर्धेत केले आहे. त्याने आव्हानाबाबत सांगितले की, त्याला भारतासाठी ऑलिंपिक जलतर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकायचे आहे. खरं तर, 2021मध्ये अभिनेता आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता दुबईत त्याच्या मुलाच्या ऑलिंपिक तयारीसाठी शिफ्ट झाले होते. (actor r madhavan son vedaant madhavan wins 5 gold 2 silver medals khelo india winter games 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अभिमानास्पद! ‘ही’ महिला बनली टी20 विश्वचषकात मैदानावर पंचगिरी करणारी पहिलीच भारतीय; जाणून घ्याच
भारतीयांनो सावधान! दिल्ली काबीज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मायदेशातून बोलावला मर्फीसारखाच आणखी एक स्पिनर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---