---Advertisement---

रैनापाठोपाठ सोनू सूदची भज्जीला मदत, ‘ही’ गरज केली पूर्ण

On: गुरूवार, मे 13, 2021 8:41 AM
---Advertisement---

बॉलिवुड अभिनेता सोनू सूद हा सध्या गरिबांचा वाली झाला आहे. त्याने कोरोना काळात अनेक गरजूंना मदत केली आहे. त्याच्याकडे मदत मागणाऱ्या प्रत्येकाला तो सतत मदत करतो आहे. अशातच भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग याने बुधवारी (१२ मे ) एका गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी ,ट्विट करत रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत सोनू सूद पुन्हा एकदा मदत करण्यासाठी पुढे आला आहे.

हरभजन सिंगने बुधवारी एक ट्विट केले होते की, “लवकर एक रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. बसप्पा रुग्णालय, ऐश्वर्या किल्ल्याच्या जवळ, चित्रदुर्गा कर्नाटक.” हे ट्विट सोनू सूदने पाहताच पुन्हा एकदा मदत करण्यासाठी त्याने त्वरित प्रतिसाद दिला. त्याने लिहिले की, “भज्जी इंजेक्शन मिळून जाईल.”

यापूर्वी सुरेश रैनाला देखील केली होती मदत

भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने देखील ट्विट करत मदत मागितली होती. त्याने ६ मे ला ट्विट केले होते.त्याने लिहिले होते की,”मेरठमधील त्याच्या काकूला ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता आहे. त्यांचे वय 65 वर्ष आहे आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना फुप्फुसांचा गंभीर आजार झाला आहे. ऑक्सिजनच्या सपोर्ट शिवाय त्यांची ऑक्सिजन पातळी 70 आहे आणि ऑक्सिजन सपोर्ट दिल्यास ऑक्सिजन पातळी 91 आहे. रैनाने आपल्या ट्विटमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनादेखील टॅग केले होते. या ट्विटला प्रतिसाद देत, सोनू सुदने लिहिले होते की, “ऑक्सिजन सिलेंडर १० मिनिटात पोहचून जाईल.” सोनू सूदने बड्या क्रिकेटपटूंनाच नव्हे तर अनेक गरजू व्यक्तींना कोरोनाच्या कठीण काळात मदत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीचे आगमन ते आयपीएलला स्थगिती; चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक

एकच नंबर! आयपीएल २०२१ दरम्यान हैदराबादच्या खेळाडूंनी लुटला बास्केटबॉल खेळण्याचा आनंद, जुना व्हिडिओ व्हायरल

इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडूही ‘या’ कारणामुळे मुकणार उर्वरित आयपीएल २०२१ हंगामाला? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---