---Advertisement---

अनुष्का शर्मा करणार स्पोर्ट्स बायोपिकमध्ये काम? ‘या’ महिला क्रिकेटपटूची भूमीका सारकरणार असल्याच्या चर्चेला उधाण

On: मंगळवार, जुलै 6, 2021 7:28 PM
---Advertisement---

गेल्या काही वर्षांत अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यात क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. येत्या काही दिवसातच १९८३ विश्वचषकावर आधारीत आणि मिताली राजच्या जीवनावर अधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच दरम्यान आता अशीही चर्चा आहे की भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या जीवनावर देखील चरित्रपट बनणार आहे आणि या चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिका निभावणार आहे.

जानेवारी 2020 मध्ये जेव्हा भारतीय जर्सीमधील अनुष्काचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हाच झुलनच्या जीवनावरील चिरित्रपटात अनुष्का शर्मा काम करणार असल्याची चर्चा पसरली होती. कोलकात्यातील ईडन गार्डनमध्ये झूलनसोबत ती दिसली होती. या चित्रपटाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, बॉलिवूड हंगामाच्या माहितीनुसार या चित्रपटाची पुढील प्रक्रिया या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे.

बॉलिवूड हंगामासाठी एका सूत्रानुसार माहिती दिली की, सध्या या चित्रपटाची प्रक्रिया सुरू आहे आणि स्क्रिप्ट देखील पूर्ण होण्याच्या शेवटच्या टप्यात आहे. सर्व काही मंजूर झाल्यानंतर अनुष्का कामकाज सुरू करेल. हे नक्कीच पुढे ढकलले जात नाही. चित्रपटाची प्रक्रिया सुरू आहे आणि पटकथेच्या टप्प्यात आहे. एकदा स्क्रिप्ट मंजूर झाल्यावर दिग्दर्शकाकडून अंतिम रुप दिले जाईल त्यानंतर अनुष्का तयारीला सुरुवात करेल. त्यानंतरच चित्रपटाचे कामकाज पुढे सुरू होईल.

झुलन गोस्वामी ही महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट गोलंदाजपैकी आहे. झुलनच्या कष्टाने आणि तिचा यशाने भारतीय महिला क्रिकेटला यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी मदत झाली आहे. 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर झुलनने कसोटीमध्ये 41 विकेट घेतले, एकदिवसीयमध्ये 236 विकेट आणि टी 20 मध्ये 56 विकेट घेतल्या आहेत. ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. विशेष म्हणजे तिच्याव्यतिरिक्त कोणालाही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 पेक्षा अधिक विकेट्स घेतला आलेल्या नाही.

झुलन अजून ही नेहमी सारखीच आक्रमक गोलंदाज करते. सध्या झुलन भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेली आहे. भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला आहे, जो अनिर्णीत ठरला. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघाने भारतीय संघावर 2-1 असा विजय मिळवला. आता 9 जुलैपासून सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत दोन्ही संघ आमने-सामने असतील.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘ती’ गोष्ट महागातच पडली आणि WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याची संधी गमावली, ऑसी कर्णधाराची व्यथा

‘क्यूटी!’ स्म्रिती मंधानाने ‘तो’ फोटो शेअर करताच चाहत्यांनी पाडला लाईक्सचा पाऊस, फोटो भलताच व्हायरल

मितालीचे पुन्हा वनडे क्रिकेटमध्ये ‘राज’; कारकिर्दीत आठव्यांदा केली ‘अशी’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---