भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू स्मृती मंधना सोशल मीडियावर खूपदा चर्चेत असते. कधी ती तिच्या कामगिरीमुळे, तर कधी तिच्या एखाद्या पोस्टमुळे ती चर्चेत येते. असेच काही दिवसांपूर्वीच स्मृतीने आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
स्मृतीने इंस्टाग्रामवर बसमध्ये प्रवास करत असतानाचा एक छान फोटो शेअर केला होता. फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘जीवनाचा देखील असाच प्रवास चालू आहे, ज्यामध्ये चढ-उतार असे प्रसंग येत आहेत.’ स्मृतीचा या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
स्मृतीने पोस्ट केलेल्या या फोटोला चाहते वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट्स करत आहेत. काही चाहते स्मृतीच्या या फोटोला ‘सुंदर’ म्हणत आहेत, तर काहीजण ‘क्युटी’ अशी कमेंट करत आहेत. स्मृतीच्या या फोटोला मोठ्या प्रमाणावर लाईक आणि शेअर केले जात आहे.
https://www.instagram.com/p/CQ8UH1araZB/
सध्या भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. तेथे भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध सध्या एकदिवसीय मालिका खेळत होते. ज्यामध्ये भारतीय संघाला 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला. एकदिवसीय मालिकेदरम्यान स्मृतीची बॅट फारशी तळपली नसली तरी, आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये स्मृतीने एक अप्रतिम झेल पकडला. ते पाहून सर्वांना आश्चर्यच वाटले.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये स्मृतीने उत्कृष्ट 49 धावा काढल्या आणि भारतीय संघाला विजयाच्या जवळ पोहोचवण्यामध्ये आपले महत्वाचे योगदान दिले होते.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अगोदर भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. या एकमेव कसोटी सामन्यादरम्यानचा देखील स्मृतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हायरल झालेला फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घातला होता.
एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय महिला संघाला इंग्लंड महिला संघाविरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे. भारतीय संघाचा इंग्लंड विरुद्ध टी20 मालिकेचा पहिला सामना 9 जुलैला खेळला जाणार आहे. दुसरा टी20 सामना 11 जुलैला आणि मालिकेचा शेवटचा टी 20 सामना 15 जुलैला खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मितालीचे पुन्हा वनडे क्रिकेटमध्ये ‘राज’; कारकिर्दीत आठव्यांदा केली ‘अशी’ कामगिरी
इंग्लंडने एका दिवसात बदलला संपूर्ण वनडे संघ, तब्बल ९ खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध पदार्पणाची संधी
यजमान इंग्लंड की पाहुणा भारत, कोण मारणार कसोटी मालिकेत बाजी? ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिले ‘हे’ उत्तर





