---Advertisement---

पुन्हा एकदा क्रिकेटशी जोडली गेली अभिनेत्री मंदिरा बेदी, आयपीएलच्या ‘या’ संघासोबत केली हातमिळवणी

On: बुधवार, जानेवारी 4, 2023 8:56 PM
Mandira-Bedi-And-IPL
---Advertisement---

मागील वर्षी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी इंडियन प्रीमिअर लीग 2023चा मिनी लिलाव कोची येथे पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू करोडपती झाले, तर काहींना एक रुपयाही मिळाला नाही. तसेच, काहींनी आयपीएल इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम घेऊन विक्रम रचला. आता आयपीएल 2023 पूर्वी संघ सक्रिय झाले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाचाही समावेश आहे. राजस्थान संघ नेहमीच युवा भारतीय खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. राजस्थान आता नवीन प्रतिभावान खेळाडूंच्या शोधासाठी एक शो घेऊन येत आहे, ज्यामध्ये देशाच्या वेगवेगळ्या शहरांमधून खेळाडूंचा शोध घेतला जाईल. या शोची होस्ट म्हणून बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश केले जाणार आहे.

आयपीएल 2023 (IPL 2023) पूर्वी राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ घेऊन येत असलेल्या शोचे होस्टिंग अभिनेत्री आणि निवेदक मंदिरा बेदी (Mandira Bedi) करणार आहे. मंदिरा दीर्घ काळापासून क्रिकेट होस्ट राहिली आहे. तसेच, तिने अनेक टीव्ही शो आणि आयपीएल सामन्यांमध्ये होस्टिंग केले आहे. अशात मंदिरा बेदीने पुनरागमन केले आहे.

राजस्थान रॉयल्स संघ ‘क्रिकेट का टिकट’ (Cricket Ka Ticket) हा शो घेऊन येत आहे. या शोचे प्रसारण कलर्स टीव्हीवर केले जाईल. मंदिरा हा शो होस्ट करेल. मंदिरा क्रिकेटविश्वातील सुरुवातीच्या महिला प्रेझेंटरपैकी एक राहिली आहे.

राजस्तान रॉयल्सने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सांगितले आहे की, हा क्रिकेट शो 8 भागांमध्ये असेल. 15 जानेवारीपासून वेगवेगळ्या ठिकाणी याचे रजिस्ट्रेशन सुरू होतील. एक पुरुष आणि एक महिला क्रिकेटपटू शोचा विजेता होईल. त्यांना 5 लाख रुपये दिले जातील. तसेच, राजस्थान रॉयल्ससोबत ट्रायलची संधीही मिळेल. प्रोमोमध्ये मंदिरा ही सर्व माहिती देत आहे.

https://twitter.com/rajasthanroyals/status/1610556692588265474?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1610556692588265474%7Ctwgr%5Ef90fcb608de71a716eed0cadd646fb4eade6f9ac%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fphoto%2Fmandira-bedi-cricket-hosting-rajasthan-royals-ipl-2023-cricket-ka-ticket-tspo-1608536-2023-01-04

मंदिराने दीर्घ काळ भारतीय संघाच्या अनेक सामन्यांमध्ये होस्टिंग केले आहे. तसेच, तिने इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) स्पर्धेतही होस्ट म्हणून काम केले आहे. तिच्या कामावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षावही केले आहे. आता या शोमधून मंदिरा पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतणार आहे.

मंदिरा ही 50 वर्षांची असून ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीदेखील आहे. तिने अनेक सिनेमात आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. तिने काम केलेल्या सिनेमांमध्ये ‘साहो’, ‘शांती’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मंदिरा तिच्या फिटनेसमुळेही माध्यमांचे लक्ष वेधत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओतील तिचा फिटनेस पाहून अनेकांना तिच्या वयावर विश्वास बसत नाही. (actress mandira bedi cricket hosting rajasthan royals ipl 2023 cricket ka ticket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! तब्बल 4 वर्षांनी केले कमबॅक, पण सामन्यापूर्वीच झाला कोरोना पॉझिटिव्ह; तरीही खेळतोय सामना
रिषभ पंतला झालेली लिगामेंटची दुखापत आहे तरी काय? लक्षणे आणि उपाय एका क्लिकवर घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---