भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा 30 डिसेंबर रोजी रुडकी येथे भीषण अपघात झाला होता. 25 वर्षीय पंत हा या भयानक कार अपघातातून थोडक्यात बचावला. त्याची गाडी थेट दुभाजकाला जाऊन धडकली होती, ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला डेहराडूनच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. आता असे वृत्त आहे की, त्याला डेहराडूनच्या रुग्णालयातून मुंबईतील रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. तिथे त्याच्या गुडघ्याच्या आणि घोट्याच्या लिगामेंट (अस्थिबंध) दुखापतीवर उपचार केले जाईल.
या अपघातात रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या डोक्याला, पाठीला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. यादरम्यान त्याच्या गुडघा आणि घोट्यामध्ये फक्त फ्रॅक्चर नाही, तर लिगामेंट (Ligament) टियर (अस्थिबंधन फाटणे) झाले आहे. मात्र, लिगामेंट इंजरी म्हणजेच अस्थिबंध दुखापत असते तरी काय? चला जाणून घेऊया…
लिगामेंट दुखापत म्हणजे काय? (What Is Ligament Injury?)
लिगामेंट दुखापत किंवा लिगामेंट फाटणे ही एकप्रकारचीच दुखापत आहे. खरं तर, गुडघ्यातील लिगामेंट हे सूक्ष्म तंतूंपासून तयार केलेले असतात. हे दोन हाडांना जोडण्याचे काम करते. तसे पाहिले, तर लिगामेंट ही खूप मजबूत असते. मात्र, जोराच्या झटक्याने किंवा दबावामुळे याला इजा होऊ शकते, ज्याला फाटणे असेही म्हणतात. खेळाडूंना नेहमी अशाप्रकारच्या दुखापतीचा सामना करावा लागतो. साधारणत: लिगामेंट दुखापत ही घोटा, गुडघा, अंगठा, मान किंवा पाठीवर होते. चला तर लिगामेंट दुखापत किती प्रकारची असते, आणि त्याची लक्षणे तसेच त्यावरील उपाय काय आहेत, जाणून घेऊया…
किती प्रकारची असते लिगामेंट इंजरी?
लिगामेंट इंजरी (Ligament Injury) झालीय हे एक्स-रे किंवा एमआरआयद्वारे माहिती केले जाऊ शकते. ही दुखापत तीन प्रकारची असू शकते. यातील एकमध्ये साधारण दुखापत असते आणि ज्यामुळे लिगामेंटला फारसा त्रास होत नाही. दुसऱ्या ग्रेडमधील दुखापतीमध्ये अर्धवट लिगामेंट फाटलेली असते. तिसऱ्या ग्रेडमधील दुखापत ही गंभीर असते. यामध्ये लिगामेंट पूर्णपणे तुटलेली असते. तसेच, त्यामुळे तीव्र वेदना होतात.
लिगामेंट फाटण्याची लक्षणे
1. लिगामेंट फाटल्यानंतर दुखापत झालेल्या जागी स्पर्श केल्यास तीव्र वेदना होते.
2. मांसपेशी मुरगळल्यासारखे वाटू शकते.
3. चालताना किंवा हालचाल करताना त्रास होतो.
4. लिगामेंट सांध्याला आधार देण्याचे आणि बळकट करण्याचे काम करते, त्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे सांधे वाकलेले असूनही तीव्र वेदना होऊ शकतात.
लिगामेंटवरील उपचार काय?
अशाप्रकारच्या दुखापतीवरील उपचार हा वय, गंभीरता आणि व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असतो. जर जास्त गंभीर दुखापत नसेल, तर व्यक्तीला विश्रांती, बर्फाचा शेक देणे आणि पाय उंचीवर ठेवण्यास सांगितले जाते. कारण, लिगामेंट फाटल्यानंतर खूपच वेदना होतात. त्यासाठी डॉक्टर पेनकिलर देऊ शकतात. जर दुखापत गुडघ्यावर झाली असेल, तर ब्रेस घालण्याची शिफारस केली जाऊ शकते. सूज कमी करण्यासाठी बर्फ लावल्याने फायदा होतो. दुखापत गंभीर असेल, तर सर्जरी देखील केली जाऊ शकते. असे असले, तरीही उपचारासाठी नेहमी डॉक्टरांच्या सल्लानेच औषधे घेतली पाहिजेत. (health update rishabh pant to be shifted to mumbai for ligament injury treatment know symptoms)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिझवान एका, तर सूर्या दोन गोष्टीत चमकला; एकदा जाणून घ्याच
विराट-सचिनबद्दल हे काय बोलून गेला संगकारा? म्हणाला, “भारतीयांना हे दोघे…”