Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रिझवान एका, तर सूर्या दोन गोष्टीत चमकला; एकदा जाणून घ्याच

रिझवान एका, तर सूर्या दोन गोष्टीत चमकला; एकदा जाणून घ्याच

January 4, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Suryakumar-Yadav-And-Mohammad-Rizwan

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय क्रिकेट संघाने 2023 वर्षाची सुरुवात विजयाने केली. भारताने श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना 2 धावांनी आपल्या नावावर केला. मात्र, 2022 हे वर्षदेखील भारतासाठी काही कारणांमुळे खास ठरले. तर त्यापूर्वीचे 2021 हे वर्ष पाकिस्तानसाठी चांगले ठरले होते. भारत आणि पाकिस्तान संघाच्या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांच्या भुवया उंचावल्या. चला तर त्यांच्या कामगिरीविषयी जाणून घेऊया…

भारताच्या सूर्यकुमारसाठी खास ठरले 2022 वर्ष?
भारतीय संघासाठी 2022 खास ठरले, कारण भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) याने हे वर्ष त्याच्या वादळी फलंदाजीने गाजवले. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये मधल्या आणि अखेरच्या षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला.

सूर्यकुमार यादव याने 2022 या कॅलेंडर वर्षात टी20 क्रिकेटमध्ये मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक 719 धावा चोपल्या. याव्यतिरिक्त त्याने अखेरच्या षटकात फलंदाजी करताना 287 धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे तो 2022मध्ये टी20त मधल्या आणि अखेरच्या षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.

पाकिस्तानच्या रिझवानसाठी 2021 वर्ष खास
पाकिस्तान संघाकडून 2021 या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये खेळताना पॉवरप्लेमध्ये मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने 2021मध्ये पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना सर्वाधिक 515 धावांचा पाऊस पाडला होता.

सूर्यकुमार यादवची टी20 कारकीर्द
सूर्यकुमारच्या टी20 कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर मार्च 2021मध्ये टी20 पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारने आतापर्यंत फक्त 43 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 42.87च्या सरासरीने 1415 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 12 अर्धशतकेही झळकावली आहेत. यादरम्यान 117 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे.

मोहम्मद रिझवानची टी20 कारकीर्द
मोहम्मद रिझवान याने पाकिस्तानकडून 2015मध्ये टी20 पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 80 सामने खेळताना 48.79च्या सरासरीने 2635 धावा केल्या होत्या. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 23 अर्धशतकेही केली आहेत. यादरम्यान नाबाद 104 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. (Most T20I runs in a calendar year see list)

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा
पॉवरप्लेमध्ये- मोहम्मद रिझवान- 515 धावा (2021)
मधल्या षटकात- सूर्यकुमार यादव- 719 धावा (2022)
अखेरच्या षटकात- सूर्यकुमार यादव- 287 धावा (2022)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट-सचिनबद्दल हे काय बोलून गेला संगकारा? म्हणाला, “भारतीयांना हे दोघे…”
श्रेयसला कर्णधार बनवण्यासाठी आणखी एक माजी क्रिकेटपटू आग्रही; म्हणाला…


Next Post
Rishabh-Pant

बीसीसीआय रिषभला देणार 16 कोटी! 'या' नियमाने होणार पंतचा फायदा

Rishabh-Pant

रिषभ पंतला झालेली लिगामेंटची दुखापत आहे तरी काय? लक्षणे आणि उपाय एका क्लिकवर घ्या जाणून

Australia-Cricket-Team

मोठी बातमी! तब्बल 4 वर्षांनी केले कमबॅक, पण सामन्यापूर्वीच झाला कोरोना पॉझिटिव्ह; तरीही खेळतोय सामना

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143