Friday, January 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीसीसीआय रिषभला देणार 16 कोटी! ‘या’ नियमाने होणार पंतचा फायदा

January 4, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rishabh-Pant

Photo Courtesy: iplt20.com


भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झालेला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला असून, त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बीसीसीआयने नुकतीच एक घोषणा केली असून, त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे आणण्यात येणार आहे. मात्र, त्याचवेळी त्याला आयपीएलसाठीचे 16 कोटी रुपये बीसीसीआयकडून देण्यात येतील.

आपल्या आईला भेटण्यासाठी रूडकी येथे जात असताना 30 डिसेंबरच्या पहाटे त्याचा अपघात झाला होता. काही स्थानिक व एका बसच्या ड्रायव्हर-कंडक्टरने त्याला वेळीच मदत करत सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले. त्यानंतर त्याला मॅक्स हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. त्याच्या डोक्याला व हाताला थोडा मार लागलेला तर, पाठीवर काही किरकोळ जखमा होत्या. मात्र त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्याचे लिगामेंट तुटल्याचे सांगण्यात येत आहे. याच लिगामेंटच्या शस्त्रक्रियेसाठी तो मुंबईत येईल.

या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला तीन ते चार महिन्यांचा अवधी लागेल. यादरम्यान तो आयपीएलमध्ये देखील सहभागी होऊ शकणार नाही. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करतो. त्याला आयपीएलच्या या हंगामासाठी 16 कोटी रुपये मिळणार होते. मात्र, आता तो खेळणार नसला तरी, हे पैसे दिल्ली फ्रॅंचाईजी नव्हेतर बीसीसीआय देईल.

असा आहे बीसीसीआयचा नियम?

आयपीएलच्या नियमानुसार एखादा खेळाडू आयपीएल सुरू होण्याआधी दुखापतग्रस्त झाल्यास त्याला मिळणारी रक्कम फ्रॅंचाईजीऐवजी बीसीसीआय देत असते. 2011 पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. मागील वर्षी दुखापतग्रस्त असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या दीपक चहर याला बीसीसीआयने लिलावात मिळालेली 14 कोटींची रक्कम दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रिषभही आता त्याला मिळणाऱ्या रकमेसाठी पात्र ठरेल.

(BCCI Pay 16 Crore To Rishabh Pant After Not Participate In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट-सचिनबद्दल हे काय बोलून गेला संगकारा? म्हणाला, “भारतीयांना हे दोघे…”
श्रेयसला कर्णधार बनवण्यासाठी आणखी एक माजी क्रिकेटपटू आग्रही; म्हणाला…


Next Post
Rishabh-Pant

रिषभ पंतला झालेली लिगामेंटची दुखापत आहे तरी काय? लक्षणे आणि उपाय एका क्लिकवर घ्या जाणून

Australia-Cricket-Team

मोठी बातमी! तब्बल 4 वर्षांनी केले कमबॅक, पण सामन्यापूर्वीच झाला कोरोना पॉझिटिव्ह; तरीही खेळतोय सामना

Mandira-Bedi-And-IPL

पुन्हा एकदा क्रिकेटशी जोडली गेली अभिनेत्री मंदिरा बेदी, आयपीएलच्या 'या' संघासोबत केली हातमिळवणी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143