---Advertisement---

भारताच्या पराभवावर पाकिस्तानच्या ‘या’ अभिनेत्रीचा डोळा; म्हणाली, ‘झिम्बाब्वेने इंडियाला हरवल्यावर मी…’

On: गुरूवार, नोव्हेंबर 3, 2022 10:55 PM
Team-India-And-Pakistani-Actress
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या गटात अद्याप उपांत्य सामन्यांसाठी दोन संघ निश्चित झाले नाहीयेत. पाकिस्तान संघाने या टी20 विश्वचषकात 4 सामने खेळले असून 2 सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे, भारत आणि झिम्बाब्वे संघात 6 नोव्हेंबर रोजी 42वा सामना मेलबर्न येथे खेळला जाईल. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिने ट्वीट करत एकच खळबळ माजवली आहे. काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया…

पाकिस्तानी अभिनेत्रीचे ट्वीट
पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री सेहर शिनवारी (Sehar Shinwari) हिने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये ती म्हणते की, “जर झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाने चमत्कारिकरीत्या भारतीय संघाला पराभूत केले, तर मी झिम्बाब्वेच्या मुलासोबत लग्न करेल.” अभिनेत्री सेहर शिनवारी हिचे हे ट्वीट तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.

पाकिस्तानच्या आशा कायम
पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा 36वा सामना डकवर्थ लुईस नियमामुळे 33 धावांनी जिंकला. या विजयामुळे पाकिस्तान संघाचे या विश्वचषकात 4 गुण झाले आहेत. पाकिस्तानचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल. दुसरीकडे, भारताचा शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होईल. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध सामना गमावला, तर पाकिस्तानचे उपांत्य फेरीसाठीचे दरवाजे उघडू शकतात. यासाठी संघाला इतर संघांच्या नेट रनरेटवरही अवलंबून राहावे लागेल.

प्रत्येकी एक वेळा कोरलंय टी20 विश्वचषकावर नाव
भारतीय संघाने एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात पहिल्यांदा 2007 सालचा टी20 विश्वचषक आपल्या नावावर केला होता. दुसरीकडे, पाकिस्तान संघाने 2009मध्ये टी20 विश्वचषकाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. मात्र, यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ 2022च्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) किताब जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे. हे सर्व आता आगामी सामन्यांवरून स्पष्ट होईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आपली टीम इंडियाची जर्सी ‘या’ खेळाडूंना देऊन अर्शदीप अन् चहल बनले हिरो, पाहा फोटो
ऑस्ट्रेलियाला मिळवायचंय टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलचे तिकीट, ‘ही’ आहेत 3 समीकरणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---