---Advertisement---

बोंबला! बाबरसेनेवर भडकली पाकिस्तानी अभिनेत्री, FIR करणार दाखल; आख्ख्या संघाला दिली खुली धमकी, पण का?

On: गुरूवार, सप्टेंबर 14, 2023 9:31 AM
Sehar-Shinwari-And-Pakistan-Team
---Advertisement---

वनडे रँकिंगमध्ये काही काळासाठी अव्वलस्थान काबीज करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट संघावर सध्या चोहो बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. यामागील कारण म्हणजे, आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीत त्यांना भारताविरुद्ध तब्बल 228 धावांनी वनडेतील सर्वात मोठा पराभव सहन करावा लागला. याच पराभवामुळे बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघावर टीकास्त्र डागले जात आहे. यामध्ये आता पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. अभिनेत्री अशी काही भडकली आहे की, तिला बाबरच्या संपूर्ण संघाला तुरुंगात पाठवायचे आहे. तिने राग व्यक्त करत चक्क धमकी दिली आहे.

अभिनेत्रीची खुली धमकी
पाकिस्तान संघाच्या खराब प्रदर्शनानंतर अभिनेत्री सेहर शिनवारी (Seher Shinwari) हिने तिच्या अधिकृत ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून राग व्यक्त केला. तिला पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रदर्शन अजिबात आवडले नाही. अभिनेत्रीने ट्वीट करत लिहिले की, “मी बाबर आझम आणि त्याच्या संघाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी जात आहे. कारण, हे लोक नेहमीच क्रिकेट खेळण्याऐवजी आमच्या राष्ट्रीय भावनांशी खेळतात.”

https://twitter.com/SeharShinwari/status/1701294334400929892?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1701294334400929892%7Ctwgr%5E94b4bc71f3296f64855b9c27571dd15ee8cf383c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.jagran.com%2Fcricket%2Fapni-baat-pakistan-actress-sehar-shinwari-threatens-babar-azam-and-his-team-to-file-fir-as-the-lost-against-india-in-asia-cup-2023-cricket-news-in-hindi-23529668.html

पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामन्यादरम्यान पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामना दोन दिवस चालला. आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील हा एकमेव असा सामना होता, ज्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत विराट कोहली (नाबाद 122) आणि केएल राहुल (नाबाद 111) यांच्या शतकाच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 2 विकेट्स गमावत 356 धावांचा पाऊस पाडला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव 32 षटकात 128 धावांवरच संपुष्टात आला होता.

अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी
सर्व बाजूंनी टीका होत असली, तरीही पाकिस्तान संघाकडे आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याची संधी आहे. पाकिस्तानला गुरुवारी (दि. 14 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला, तर त्यांना अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला, तर नेट रनरेटच्या आधारे श्रीलंका संघ अंतिम सामन्यात पोहोचेल. (actress threatens babar azam and his team to file fir as the lost against india in asia cup 2023 know here)

हेही वाचा-
ट्रेंट बोल्टने रचला इतिहास! इंग्लंडच्या पाच विकेट्स घेत बनला इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन आली समोर, बाबरच्या संघात पाच महत्वाचे बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---