ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने शेवटी मान्य केले की, त्याला भारताचा माजी फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मण आणि दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग या दोघांनी ऑस्ट्रेलिया संघाला खूप त्रास दिला. २०००च्या सुरुवातीला या दोघांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खूप सतावले होते. Adam Gilchrist Confessed That VVS Laxman And Harbhajan Singh Trouble Us Lot In The Early Of 2000
गिलख्रिस्टने टीव्ही प्रस्तुतकर्ता मडोना टिक्सेरा यांच्या शो ‘लाइव्ह कनेक्ट’वर बोलताना सांगितेल की, “लक्ष्मण (VVS Laxman) भारतीय संघातील इतर फलंदाजांसोबत मिळून आमच्याविरुद्ध खूप धावा करत असायचा. त्यानंतर आमच्या फलंदाजीच्या वेळेला हरभजन (Harbhajan Singh) येऊन आमच्या विकेट्स घेत असायचा.”
गिलख्रिस्टने जानेवारी २००८मध्ये ऍडलेड येथे भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी माध्यमात अशी वृत्ते आली होती की, गिलख्रिस्टने लक्ष्मणचा झेल सोडल्यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला होता. याविषयी बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला की, “जर तुम्ही लक्ष्मणचा झेल सोडत असाल, तर मला वाटते की हे निवृत्ती घेण्याचे चांगले कारण असेल. अशा खेळाडूला जास्त संधी नाही द्यायला पाहिजे.”
गिलख्रिस्टला आधीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये असताना निवृत्ती घ्यायची होती. “निवृत्तीविषयी बोलायचे झाले तर, मी नेहमी विचार करत असायचो की, मी जेव्हाही निवृत्ती घेईल. तेव्हा सर्वांनी मला म्हणायला पाहिजे की, तू आता निवृत्ती नको घेऊ. तू अजून क्रिकेट खेळू शकतोस,” असे पुढे बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला.
गिलख्रिस्टने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३९६ आंतरराष्ट्रीय सामने खेळत एकूण ९०५ यष्टीमागील विकेट्स घेतल्या आहेत. यात त्याच्या यष्टीमागील ८१३ झेलबाद आणि ९२ यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे. तसेच, गिलख्रिस्टने फलंदाजीतही दमदार कामगिरी केली आहे. त्याने ९६ कसोटी सामन्यात ५५७० धावा, २८७ वनडे सामन्यात ९६१९ धावा आणि १३ टी२० सामन्यात २७२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
स्वातंत्र्य दिनी सचिन तेंडुलकर आयडीबीआय फेडरल फ्यूचर फियरलेस मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवणार
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टोक्सच्या जागी या क्रिकेटरला मिळाली संधी
जर २०२१ विश्वचषक आयोजनाला भारत नाही म्हटला तर हे देश आहेत तयार
ट्रेंडिंग लेख –
मला रोज २ ग्लास उसाचा रस द्या, पाकिस्तानकडून खेळायला लागल्यावर तु्म्हाला उसाचा रस काढायची मशीन देईल!
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी