ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज ऍडम झम्पा याच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन (Adam Zampa Blessed With Baby Boy) झाले आहे. त्याची पत्नी हॅरियट पाल्मर लीग हिने रविवारी (१२ जून) एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. झम्पाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. झम्पाने त्याच्या नवजात मुलाचा फोटो इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. मात्र फोटोत त्याने बाळाचा चेहरा दाखवलेला नाही.
आपल्या पहिल्या बाळाच्या (Adam Zampa Son) जन्माच्या कारणासाठीच झम्पा (Adam Zampa) ऑस्ट्रेलिया संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर गेला नाहीये. ऑस्ट्रेलियाचा संघ ७ जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात या दौऱ्यात ३ सामन्यांची टी२० मालिका, ५ सामन्यांची वनडे मालिका आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे.
झम्पाने हॅरियटशी (Harriet Palmer) २३ जून २०२१ मध्ये लग्न केले होते. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर झम्पाने हॅरियटशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मे २०२२ मध्ये मातृत्त्व दिनाचे औचित्य साधत झम्पाच्या पत्नीने स्वत आपण गरोदर असल्याची माहिती दिली होती. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत लिहिले होते की, ‘मी आई बनण्यासाठी उत्सुक आहे आणि झम्पाला वडिल बनल्याचे पाहण्यासाठीही उत्साहित आहे.’ यानंतर आता हे दोघे आई-बाप बनले आहेत.
ऍडम झम्पाची क्रिकेट कारकिर्द
झम्पाने फेब्रुवारी २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने १२० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये ६७ सामने खेळताना त्याने १०३ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ३० धावांवर ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी राहिली आहे. तसेच ६२ टी२० सामने खेळताना त्याने ७१ विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत.
याखेरीज तो जगप्रसिद्ध टी२० लीग, आयपीएलचाही भाग राहिला आहे. राइजिंग पुणे सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांचा तो भाग राहिला आहे. गेल्या २ वर्षांपासून मात्र त्याने आयपीएल खेळलेली नाही. बायो बबलमुळे २०२१च्या हंगामातून माघार घेतल्यानंतर २०२२ मध्ये तो अनसोल्ड राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याही संयमाचा बांध, भलताच झालेला ‘अँग्री यंग मॅन’
कर्णधार रिषभ पंतची बॅट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ओकणार आग! पूर्ण करणार षटकारांचे ‘हे’ खास शतक
अँडरसनच्या आधी बोल्टने केली मुरलीधरनच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी