---Advertisement---

ऑस्ट्रेलियन पठ्ठ्याच्या घरी होणार चिमुकल्या पावलांचे आगमन; पत्नीचा फोटो केला शेअर

On: शनिवार, जानेवारी 15, 2022 3:50 PM
Adam Zampa with Wife
---Advertisement---

नवीन वर्ष २०२२ अनेकांच्या आयुष्यात आनंदाची वार्ता घेऊन आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे ऑस्ट्रलिया क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज ऍडम झम्पा. झम्पाने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गोड बातमी दिली आहे. तो या वर्षात बाबा होणार असल्याचे त्याने सोशल मीडियावरून सांगितले आहे.

झम्पाने त्याच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन पत्नीचा फोटो पोस्ट करत ‘राजकुमारसोबत २० आठवडे’, असं लिहीत चाहत्यांना ही बातमी सांगितली आहे. त्याच्या या पोस्टला २१ हजारांहुन अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत असतानाच पत्नी हेटीने ‘लव यु’ अशी कमेंट केली आहे.

https://www.instagram.com/p/CYtFt5OBp_h/

लॉकडाऊननंतर गेल्यावर्षी ऍडम झम्पाने त्याची प्रेमिका हेटी लेहसोबत लग्न केले आहे. गतवर्षी जास्तीत जास्त देश कोरोनामुळे लॉकडाऊनचा सामना करत होते, तेव्हा झाम्पाला सुद्धा दोनवेळा लग्न पुढे ढकलावे लागले होते. पण अखेर त्याने जून २०२१ मध्ये झम्पाने आपला लग्नसोहळा उरकला. याबाबत झम्पाने सोशल मीडियावर खुलासा केला नव्हता. पण, इंस्टाग्रामवर वधुचा ड्रेस डिझाईन करणाऱ्या केट व्हीला कंपनीने फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांना ही बातमी समजली. यानंतर खुद्द हॅटीनेही लग्नाचे फोटो शेअर केले होते.

ऍडम झम्पा हा ऑस्ट्रलियातील फिरकी गोलंदाज आहे. त्याने २०१६ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आत्तापर्यंत ६४ एकदिवसीय सामने खेळले असून ३२.११ च्या सरासरीने ९७ गडी बाद केले आहेत.  तसेच त्याने १९८ टी२० प्रकारातील सामने खेळले असुन ३१.९३ च्या सरासरीने २३० गडी बाद केले आहेत. तो इंडीयन प्रिमीयर लीगमध्ये राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघातून खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

युवा टीम इंडियाचा १९ वर्षांखालील विश्वचषकात राहिलाय दबदबा! रोहितसह ‘या’ खेळाडूंच्या नावावर ऐतिहासिक विक्रम

भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आमने-सामने आले जाफर आणि वॉन, पेटले ट्वीटरवॉर

केपटाऊन कसोटीतील डीआरएसच्या वादानंतर भारतीय खेळाडूंवर होणार कारवाई? वाचा सविस्तर

व्हिडिओ पाहा – वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---