ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपटू ऍडम झम्पा अखेर बोहल्यावर चढला आहे. झम्पाने गर्लफ्रेंड हॅटी पार्मरसोबत लग्न केले आहे. ही बातमी झम्पाची पत्नी हॅटीने आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून फोटो पोस्ट करत सर्वांना दिली.
झम्पाचे लग्न मागील आठवड्यात झाले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांचे लग्न दोन वेळा रद्द झाले होते. परंतु आता दोघेही लग्न बंधनात अडकले आहेत.
ऍडम झम्पा आणि हॅटी पार्मर हे खूप दिवसांपासून सोबत
ऍडम झम्पा आणि हॅटी पार्मर हे दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. हॅटी झम्पासह परदेशी दौर्यावर ही जात असते. हॅटी 2017 मध्ये झम्पासोबत भारतामध्ये आली होती. 2017 मध्ये झम्पा आयपीएल स्पर्धेत राइजिंग पुणे सुपरजायंट्स या संघाचा एक भाग होता.
https://www.instagram.com/p/CQX6gpfBPzJ/
वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार ऍडम झम्पा
ऍडम झम्पा लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाला वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात झम्पा खेळताना दिसून येणार आहे. यापूर्वी झम्पाने आयपीएल 2021 सुरु असताना कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या कडक नियमांमुळे स्पर्धेतून माघार घेत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता.
झम्पाची कामगिरी
ऍडम झम्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला पहिला एकदिवसीय सामना 6 फेब्रुवारी 2016 न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळला होता. त्याचबरोबर टी20 मध्ये त्याने आपला पहिला सामना 7 मार्च 2016 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाच्या विरुद्ध सामना खेळला होता. त्याने 61 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर 40 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 92 विकेट्स घेतल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये त्याने 43 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आहा…भारीच की! निसर्गाच्या सानिध्यात धोनी कुटुंबांसोबत घालवतोय वेळ; व्हिडिओत दिसला वर्कआऊट करताना
अजबच! फलंदाजाने इतका जोरात षटकार खेचला की स्वत:च्याच कारची फोडली काच, व्हिडिओ होतोय व्हायरल